श्रीवर्धन

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे खरे,पण श्रीवर्धनमध्ये  नागरिकांचा  मास्क  हनुवटीवर नाक-तोंड उघडेच असल्याचे प्रकर्षाने जाणवते.त्यामुळे परस्परांच्या संपर्कातून कोरोनाचा फैलाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत  असतांना देखील  अजूनही त्याबाबतचे अपेक्षित  गांभीर्य दिसून येत नाही ही दुर्दैवाने वस्तुस्थिती  आहे. .सुदैवाने श्रीवर्धन तालुक्यात तुलनेने कोरोना प्रादुर्भावाचे प्रमाण कमी असले तरीही  नागरिकांनी आवश्यक ती किमान काळजी  घेतली नाही तर तो कधीही वाढू शकतो हे अनेक ठिकाणच्या उदाहरणांवरुन सिद्ध झाले आहे. अलिकडे श्रीवर्धन शहरांत-विशेषतः बाजार पेठ,दुकानांवर,बँकांमध्ये रोज गर्दी दिसते.इतकी की केव्हा केव्हा तर वाहतुकीचाही दहा-दहा मिनिटे खोळंबा होतो.त्यामुळे सामाजिक अंतर राखणे हा विषयच रद्द झाला आहे की काय अशी शंका येते.मास्क वापरणा-यांचे प्रमाणही फार कमी दिसते.दंड होऊ नये म्हणून बर्‍याच जणांचा मास्क बरोबर असतो परंतु त्याची जागा नाक-तोंड झाकण्यासाठी नसून हनुवटीवरच असत.याबाबच  अंमलबजावणीसाठी काही कठोर उपाययोजनांची गरज आहे. अन्यथा दुर्दैवाने श्रीवर्धन तालुक्यात व शहरांतही कोरोना केव्हा उग्र रुप धारण करील याचा नेम नाही.

 

अवश्य वाचा