महाड

महाड शहरा पासुन अवघ्या एक किलो मिटर अंतरावर असलेल्या शिरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दींतील अदिवासी वाडी मध्ये भर पावसाळ्यांत पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे,गेल्या कांही दिवा पासुन  वाडीतील आदिवासी महिलांना पाण्या साठी भटवैंती करावी लागत आहे.अन्य वापरा करीता या आदिवासींना डबक्यांतील साठलेल्या पाण्याचा वापर करावा लागत आहे,ग्रामपंचायती कडून या वाडीला कमी दाबाने पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने एक हजार लिटरच्या साठवण टाक्या देखिल पाण्याने भरत नसल्याची तक्रार आदिवासीनी प्रशासना कडे केली आहे.

महाड औद्योगिक विकास महामंडळा कडून तालुक्यांतील खाडी विभागांत असलेल्या वीस गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यांत येतो.याच जलवाहीनीतील पाणी शिरगाव ग्रामपंचायतीला देखिल दीले जाते.ग्रामपंचायती कडून गावाला पाण्याचा मुबलक पाण्याचा पुरवठा केला जातो परंतु जवळच्या आदिवासी वाडीला मात्र कमी दाबाने पाण्याचा पुरवठा केला जातो.गेल्या अनेक महिन्या पासुन वाडीला पाण्याचा कमी पुरवठा होत असल्यामुळे वाडी मध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.पंचायती कडून जाणीव पुर्वक दुजाभाव करण्यांत येत असल्याची तक्रार येथील महिलांनी केली आहे.ग्रामपंचायती कडून पाणी कमी दिले जात असल्याने वाडी वर असलेल्या एक हजार लिटरच्या साठवण टाक्या भरल्या जात नाहींत.महिलांना पाण्या साठी वणवण करावी लागत असुन अन्य वापरा करीता जवळच्या डबक्यातील पाण्याचा वापर करावा लागत असल्याचे महिलांनी सांगितले.वाडी जवळ राहात असलेले सामाजिक कार्यकर्ते गोपाळ कांबळे यांनी आपल्या घरा समोर एक साठवण टाकी बांधली असुन त्या टाकीतील पाणी कांबळे वाडीतील महिलांना देत असल्याने पाण्याची अडचण थोड्या फार प्रमाणांमध्ये सुटण्यास मदत झाली आहे.

शिरगाव आदिवासी वाडी मध्ये 39 कुटूंबे वास्तव्य करीत असुन वाडीची लोक संख्या 120 आहे,येथील आदिवासींना कायम स्वरुपी रोजगार नसल्याने दिवसाचा रोजगार करुन आपल्या कुटूबाचा उदरनिर्वाह चालवावा लागतो,वाडी मध्ये पिण्याच्या पाण्याची  समस्या असुन ती सोडविण्यांत यावी अशी मागणी महाडचे प्रांताधिकारी,तहसिलदार,गट विकास अधिकारी त्याच बरोबर स्थानिक प्रतिनिधीं कडे केली आहे. शिरगाव मधील सामाजिक कार्यकर्ते गोपाळ कांबळे,आदिवासी वाडीतील काळू मुकणे,नरेश वाघमारे,विष्णु मुकणे,बाळू मुकणे,गोपिनाथ मुकणे,बेंडू वाघमारे,गोपिनाथ मुकणे,यांनी वारंवार तक्रार करुनही दुर्लक्ष करण्ंयात येत असल्याचा आरोप करण्ंयात येत आहे.गेल्या अनेक महिन्या पासुन वाडीतील महिला कांबळे यांच्या घरा समोर असलेल्या टाकीतील पाणी पिण्यासाठी आणीत आहेंत.डोक्यावरुन हंडे आणावे लागतात,महिलांना खुप त्रास सहन करावा लागतो,आम्हा वाडीतील महिलांची समस्या तातडीने सोंडविण्यांत यावी अशी मागणी सुनिता वाघमारे यां आदिवासी महिलेने केली आहे.

 

अवश्य वाचा

राज्यभरात पावसाचा धुमाकुळ

नेरळ रेल्वे गेट 21 पासून बंद