रायगड
नेरळ | वार्ताहर
कडाव येथील हुतात्मा हिराजी पाटील ज्युनिअर कॉलेज कर्जत तालुक्यातील कडाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
कडाव ग्रामपंचायतीचे सरपंच अशोक पवार, माजी सरपंच राजू भोपतराव, उपसरपंच हर्षद भोपतराव, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर गंगावणे, मुग्धा ताम्हाणे, ढोलकी वादक प्रदीप ताम्हाणे, राकेश देशमुख, झांज वादक आशुतोष ताम्हाणे, शालेय समिती सदस्य वसंत जाधव, मंगेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. दिनेश भुसारी, प्रा. स्वप्निल कर्णुक, प्रा. श्रीकांत आगीवले, प्रा. राधिका राणे, प्रा. योगीता जाधव आदी उपस्थित होते.सुरुवातीला प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनीषा बैकर यांनी केले.
यावेळी महाराष्ट्र शाहिर परिषदेचे रायगड जिल्हा अध्यक्ष शिवशाहीर गणेश ताम्हाणे यांनी पोवाड्याच्या माध्यमातून शिवचरित्राचे सादरीकरण केले. त्यांनी आपल्या सहकार्यांसह शिवाजी महाराज यांचा स्वराज्य संग्राम जिवंत केला.