अलिबाग 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला, या  निकालामध्ये कोकण एज्युकेशन सोसायटीच्या अलिबाग येथील अँड. नंदा देशमुख इंग्रजी माध्यम माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादीत केले आहे. शाळेचा निकाल 99.24 टक्के लागला. 133 पैकी 132 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

क्रिश सुदर्शन घातकी हिने 96 टक्के गुण मिळवत पहिली, नुपूर सुबोध पाटील हिने 95.40 टक्के मिळवत व्दितीय, तर समृध्दी सचिन फडके हिने 95 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.

सर्व यशस्वी विद्यार्थांचे शाळा व्यवस्थापन समितीचे चेअरमन, सदस्य,  मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

 

अवश्य वाचा

राज्यभरात पावसाचा धुमाकुळ

नेरळ रेल्वे गेट 21 पासून बंद