कोर्लई 

साळाव - मुरुड रस्त्यावर काशिद येथे अभिषेक काते यांचे हाँटेल ते काशिद-बिच दरम्यान नबाब कालीन मोरीची मागील पावसाळ्यापासूंन पार दुरावस्था झालेली असून याकडे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त होत असून दुरुस्तीची मागणी जोर धरत आहे.

मागील पावसाळ्यात तसेच समुद्राच्या उधाणाच्या पाण्यामुळे या मोरीच्या पृष्ठभागाची मोठ्या प्रमाणावर झीज होऊन धोका निर्माण झाला आहे. यामुळे वेळप्रसंगी पावसाळ्यात दोन तालुक्याचा संपर्क तुटला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी यात लक्ष पुरवून काशिद येथील मोरीच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर व्हावे. अशी मागणी वाहनचालक व नागरिकांतून होत आहे.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता, सदर मोरीच्या दुरुस्तीचा प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आला असल्याचे कनिष्ठ अभियंत्यांनी सांगीतले.