Wednesday, May 19, 2021 | 01:52 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

कामगार सेनेच्या सरचिटणीसपदी एस. एम गायकवाड
रायगड
04-Apr-2021 06:22 PM

रायगड

। रसायनी । प्रतिनिधी ।

रसायनी परिसरात केंद्र सरकारच्या उपक्रमांतर्गत स्थापित असलेली हिल इंडिया लिमिटेडच्या रसायनी कामगार सेनेची कार्यकारिणी निवड नुकतीच झाली. यावेळी संघटनेच्या सरचिटणीसपदी एस. एम. गायकवाड यांची नियुक्ती, तर संघटनेच्या कार्याध्यक्षपदी रमेश पाटील यांची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी सुनील पाटील व भालचंद्र वरसोलकर, संयुक्त चिटणीस रावसाहेब पाटील, ए. टी. जाधव व शैलेश बर्वे असून खजिनदारपदी राहुल जाधव यांची निवड करण्यात आली आहे. 

यावेळी रसायनी कामगार सेना संघटनेचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ, कार्याध्यक्ष सुनील साळवी, रमेश पाटील, सुनील पाटील, भालचंद्र वरसोलकर, एस.एम गायकवाड, पी.पी बोहोत, जी. के कांबळे, रवी वाल्मिकी, बी.डब्लू. गायकवाड, पी.व्ही जाधव, सुजित सोनावळे, भास्कर गायकवाड, आर.बी. पाटील, राहुल जाधव आदी उपस्थित होते.

हिल इंडिया लिमिटेड या रसायनीतील कंपनीच्या प्रलंबित विषयाबाबत मागील महिन्यापूर्वीच रसायनी कामगार सेना या युनियनच्या पदाधिकार्‍यांनी युनियनचे अध्यक्ष तसेच माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांची भेट घेतली होती. त्यावेळी अनुकंपातत्त्वावर भरती प्रक्रिया लवकर सुरू व्हावी, कामगारांचे पी. एफ चे पैसे वेळेत भरण्यात यावेत तसेच इतर विषयांवर चर्चा केली असता तात्काळ मा.खासदार अडसुळ यांनी कंपनीचे चेअरमनसोबत फोनवर संवाद साधून कामगारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक चर्चा केली.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top