अलिबाग  

 करोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पेण यांनी 15 जुलै पासून लॉकडाऊन जाहीर केला आहे.  त्या अनुषंगाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे जनतेची गर्दी कमी करणे आवश्यक असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दि.15 जुलै 2020 पासून लॉकडाऊन कालावधी संपेपर्यंत उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील शिकाऊ व कायम अनुज्ञप्ती कामकाज, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण कामकाज व इतर कामकाज स्थगित करण्यात आले आहे.

या कालावधीत विविध कामांसाठी पूर्वनियोजित वेळ घेतलेल्या नागरिकांची कामे टाळेबंदी काळानंतर समायोजित केली जातील. टाळेबंदीच्या कालावधीत नागरिकांना पूर्वनियोजित वेळा मिळालेल्या असल्यास किंवा काही कागदपत्रे सादर करावयाची असल्यास संबधित नागरिकांची कामे टाळेबंदी संपल्यानंतर केली जातील याची नोंद घ्यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती उर्मिला पवार यांनी कळविले आहे.

अवश्य वाचा