गोवे-कोलाड :

मुंबई-गोवा महामार्गावरील खांब जवळील सुकेळी खिंडीच्या पायथ्याशी मोकाट गुरांचे रस्ता रोको केल्याने प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. या महामार्गावर मोठया प्रमाणात मोकाट गुरांचे प्रमाण वाढले असुन याकडे संबंधित व्यक्तीकडुन लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

रोहा तालुक्यातील शेती विकणार्‍या शेतकर्‍यांची बिनकामी गुरे मोकाट सोडलेली आहेत. तर जमिनी विकत घेतलेल्या मालकांनी सर्व शेती भोवती तारेचे कुंपण घातले आहे. त्यामुळे या शेतकर्‍यांच्या गुरांना चरण्यासाठी जागा राहिलेली नसल्याने ही गुरे मोकाट सोडली असुन ही गुरे मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्याच्या मधोमध उभे राहुन जणु रास्ता रोको केल्याचे दिसुन येत आहे.

या मोकाट गुरांनमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असुन मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला. यातच गुरांना अपघात झाला तर शेतकरी भरपाई मिळण्यासाठी धावत येतो. परंतु गुरांमुळे वाहन-चालक व प्रवाशांचा अपघात झाला तर शेतकरी जवळ येत नाही. अशा मोकाट गुरांचा बंदोबस्त संबंधितनकडून करण्यात यावा अशी मागणी प्रवासी वर्गाकडुन केली जात आहे.

अवश्य वाचा

बदनामी प्रकरणी आठ आरोपींवर

उरण तालुक्यात वीज पुरवठा....