Wednesday, December 02, 2020 | 11:41 AM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

रेवस - करंजा जेट्टींचे एप्रिलपर्यंत पूर्ण होणार
रायगड
28-Oct-2020 08:27 PM

रायगड

अलिबाग 

 रेवस - करंजा रो रो सेवा सुरु करण्यासाठी करंजा येथील जेट्टी व टर्मिनलचे काम पुर्ण झाले आहे. तर शेकापचे आमदार जयंत पाटील, तत्कालीन आमदार पंडित पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या रेवस येथील जेट्टी व टर्मिनलच्या कामांना सुरुवात झाली आहे. या कामांना गती देण्यासाठी संबंधित ठेकेदार व विभागाचे अधिकारी यांना सुचना करण्यात आल्या आहेत. एप्रिल 2021 पर्यंत हे काम पुर्ण होईल असा विश्‍वास महसूल, ग्रामविकास, बंदरे विभागाचे राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांनी व्यक्त केला.

रेवस येथील जेट्टीच्या कामाची पाहणी करण्याबरोबरच जिल्हयात चक्री वादळ व परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे,  आदी उपस्थित होते.

 चक्री वादळातील नुकसानग्रस्तांसह शेतकर्‍यांना मदतीचा हात राज्य सरकारकडून देण्यात आला आहे. परतीच्या पावसामुळेदेखील शेतकर्‍याचे खुप मोठे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडून नुकसानीची अहवाल प्राप्त झाल्यावर तातडीने शेतकर्‍यांना भरपाई देण्याचा निर्णय सरकार घेणार आहे. यावेळी दहा हजार प्रति हेक्टर भरपाई देण्यात येणार आहे. तसेच खारजमीनीचेदेखील प्रचंड नुकसान झाले आहे. जूने बंधारे फुटून जाऊन खारजमीन नापिक झाली आहे.  खारेपाटातील शेतकर्‍यांचे नुकसान भविष्यात होणार याकडे पुढच्या काही महिन्यात लक्ष देऊन विशेष निधीची तरतूद करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

 बंदराचा विकास करीत असताना, येथील मच्छीमारांवर अन्याय होणार नाही. याकडे प्राधान्याने पाहिले जाणार आहे. रो - रो सेवा सुरु करताना मच्छीमारांच्या बोटींना कोणताही धोका निर्माण होणार नाही. याकडे लक्ष देण्यात आले आहे. तसेच वाढत्या रहदारीमुळे  रुंदीकरणाबाबत सर्वे करण्याथ आला आहे. ज्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करायचे त्याठिकाणी रस्ता रुंदीकरणाबाबत सरकार निर्णय घेऊन विकास साधणार आहे असे राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांनी सांगितले.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top