वाकण 

 फिट इंडिया फ्रीडम रन म या अभियानाचा शुभारंभ केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी  केला. या अभियानात रिलायन्स विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.

 नागोठण्यातील रिलायन्स फाउंडेशन विद्यालयाच्या इंग्रजी माध्यमाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या मुलींच्या तुकडीची स्थापना गेल्या वर्षी करण्यात आली. 25 छात्रांच्या तुकडीने आणि त्यांच्या केअर टेकर ऑफिसर शिक्षिका श्रीमती श्‍वेता मिश्रा यांनी ऊन - पाऊस कशाचीही तमा न बाळगता आपल्या परिसरात दररोज किमान 1 किलोमीटर धावण्याचा संकल्प दिनांक 14 ऑगस्ट 2020 पासून अविरत चालू ठेवला आहे. रिलायन्स फाउंडेशन विद्यालय , नागोठणे (इंग्रजी माध्यम) ही अशा प्रकारचा उपक्रम मुलींच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या तुकडीकडून राबविणारी  रायगड जिल्ह्यातील एकमेव शाळा आहे.

 1महाराष्ट्र गर्ल्स बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल सतीश वत्स, अडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर मेजर एकता जैसवाल यांच्या कुशल नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली रिलायन्स फाउंडेशन शाळेतील मुलींची तुकडी राष्टीय छात्र सेनेचे विविध उपक्रम उत्तम प्रकारे राबवित  आहे.   हा उपक्रम यशस्वीपणे राबविणार्‍या आणि मफिट इंडिया म मोहिमेचा उद्देश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविणार्‍या सर्व छात्रा आणि त्यांच्या  कमांडिंग ऑफिसर यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. 

 

अवश्य वाचा