पेण

पेण नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांकडून येथील कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांशी दुजाभाव होत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी उपविभागीय अधिकार्‍यांनी असे प्रकार घडल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

पेण शहरात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र पेण नगरपालिका प्रशासनाला कोरोना संसर्ग रोखण्यात अपयश तर आलेले आहेच, त्याचबरोबर ज्या कुटुंबात संसर्ग झालेला आहे त्या कुटुंबियांना वाळीत टाकल्याप्रमाणे नगरपालिकेचे कर्मचारी वागत आहेत. रामवाडी मधील एक जेष्ठ नागरीक स्वतः कोरोना बाधित झाले असुन त्यांच्या घरात त्यांची मुलगी व पत्नी राहत आहे. ते स्वतः उपजिल्हा रूग्णालय पेण येथे उपचार घेत आहेत. मात्र नगरपालिकेचे कर्मचारी त्यांच्या घरातील केरकचरा घेण्यास नकार देत आहेत. अशा कर्मचार्‍यांवर नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांनी कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

अवश्य वाचा

राज्यभरात पावसाचा धुमाकुळ

नेरळ रेल्वे गेट 21 पासून बंद