उरण 

नकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात  सर्वत्र लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे .या काळात सार्वजनिक ठिकाणी सर्व धर्माचे धार्मिक कार्यक्रम ,प्रार्थना आदीवर निर्बंध घालण्यात आले आहेत .त्या अनुषंगाने लॉक डाऊन च्या कालावधीत नमाज पठण, एकत्र न येण्याबाबत  केंद्र सरकारच्या अल्पसंख्यांक कार्य मंत्रालयाने सूचना दिल्या आहेत .

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात सर्वत्र लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे . त्या नुसार उरण शहर सह तालुक्यातील मुस्लीम समाजातील बांधवांनी मस्जिद मध्ये न जाता आपल्या घरातच सोशल डीस्टन्सिंग  पाळून व शासकीय ,व धार्मिक नियमांचे पालन करून  शनिवार  सकाळी 7  नंतर रमजान ईद ची नमाज  अदा केली,असे उरण शहरातील सामाजिक कार्यकर्ते अदिब भाईजी यांनी सांगितले.

 

अवश्य वाचा