श्रीवर्धन

श्रीवर्धन नगरपालिका नगराध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली आहे.त्यासाठी  बुधवारी  (23 सप्टेंबर) नामांकन अर्ज दाखल करायचे होते .शिवसेनेकडून नगरसेवक अनंत गुरव तर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस व शेकाप आघाडीद्वारे उप नगराध्यक्ष तथा प्रभारी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक यांचा उमेरवारी अर्ज दाखल करण्यात आला .संख्याबळ पाहता जितेंद्र सातनाक यांची निवड निश्‍चित मानली जात आहे .झाल्यात जमा आहे .

गुरुवारी  अर्ज छाननी असून   शुक्रवारी  25 सप्टेंबरला नगरसेवकांच्या मतदानातून निवड होणार आहे  आघाडीचे नगरसेवक खासदार तटकरे यांच्या शब्दा बाहेर नसल्याने दगाफटका होण्याची सुतराम शक्यता नाही .प्रत्यक्ष मतदान झाले तरी सातनाक यांचे पारडे जड असल्याने दि 25 सप्टेंबर रोजी सातनाक यांना पुढील नगराध्यक्ष म्हणून अधिकृतरीत्या पदभार मिळेल .आघाडी तर्फे सातनाक यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते .सकाळी 10वाजताच आमदार अनिकेत तटकरे नगरपरिषद कार्यालयात दाखल  झाले .नगरपरिषदेत आल्यानंतर त्यांनी आघाडीच्या प्रत्येक नगरसेवकाचे मत जाणून घेऊन चर्चा केली .या चर्चेत आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या निवडीचे अधिकार खासदार सुनील तटकरे  यांना दिले .सर्वांची मते जाणून घेतल्यावर पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या समवेत मोबाईल वरून खासदार तटकरे यांना आपल्याला सर्वानी निवडीचे अधिकार दिल्याने सर्वांचे आभार मानत उर्वरित कालावधीतील पहिल्या सहा महिन्यासाठी प्रभारी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक यांना व पुढील उर्वरित कालावधीसाठी फैसल हुरजूक याना संधी दिल्याचे जाहीर केले .तसेच उपनगराध्यक्ष पदासाठी लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर करून उपनगराध्यक्ष  पदावर नगरसेवकांना संधी देण्याचे जाहीर केले .या वेळी मोबाईल वरून संवाद साधताना खासदार तटकरे  म्हणाले की, श्रीवर्धन करांनी तटकरे कुटुंबियांना या आधी खूप साथ दिली तशीच साथ पुढे राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली . प्रक्रिया खेळी  मेळीच्या वातावरणात पार पडली .या वेळी सर्व नगरसेवक तालुका अध्यक्ष दर्शन विचारे, पक्षाचे कार्यकर्ते उपस्थति होते .

अवश्य वाचा