Wednesday, May 19, 2021 | 02:24 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

रश्मी शुक्ला यांना मानिसक छळाची भीती
रायगड
03-May-2021 07:48 PM

रायगड

 

| मुंबई | प्रतिनिधी |

 मुंबई पोलिसांनी बजावलेल्या समन्स विरोधात रश्मी शुक्ला यांनी हैदराबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुंबई पोलिसांनी समन्स पाठवून मानसिक छळ न करण्याची सूचना मुंबई पोलिसांना करावी अशी विनंती करणारी याचिका रश्मी शुक्ला यांनी हैदराबाद उच्च न्यायालयात दाखल केली आहे. 

 मुंबई पोलिसांचं सायबर सेल महाराष्ट्रात पोलिसांच्या बदल्यांच्या रॅकेट संदर्भातील फोन टॅपिंग प्रकरण आणि गोपनिय माहिती लीक झाल्या प्रकरणी चौकशी करत आहे. यासंदर्भात सायबर सेलनं दोन वेळा आयपीएस अधिकारी आणि गुप्तचर विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांना दोन वेळा समन्स पाठवून चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. याच समन्स विरोधात रश्मी शुक्ला यांनी हैदराबाद हायकोर्टात धाव घेतली आहे. रश्मी शुक्ला यांनी आपल्या याचिकेत मुंबई पोलिसांनी धाडलेलं समन्स अवैध असल्याचंही सांगितलं आहे.  आपल्या याचिकेत रश्मी शुक्ला यांनी न्यायालयाला या प्रकरणाचे तपास अधिकारी एसीपी नितिन जाधव यांना मानसिक छळ न करण्यासाठी सूचना द्याव्यात अशी विनंती केली आहे. रश्मी शुक्ला यांचं म्हणणं आहे की, तपास अधिकारी एकापाठोपाठ एक समन्स पाठवून त्यांना त्रास देत आहेत. अधिकारी रश्मी शुक्ला सध्या हैदराबादमध्ये सीआरपीएफच्या अतिरक्त पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.

 

 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top