पुणे 

सध्याच्या काळात अत्यंत महत्वपूर्ण असलेला एन-95 मास्कची सुवर्ण कलाकृती रांका ज्वेलर्सने घडविलेली आहे. या कलाकृतीचे वैशिष्ट्य म्हणजे आत्ता तुम्ही हा मास्क म्हणून वापरू शकता आणि नंतर नेकलेस म्हणूनही परिधान करू शकता. 22 कॅरेट सोन्यामध्ये घडविण्यात आलेल्या या नेकलेस (चोकर) कम गोल्डन मास्कचे वजन अवघे 124.5 ग्रॅम असून रांका ज्वेलर्सच्या एका प्रतिष्ठित ग्राहकाला हा मास्क नुकताच सुपूर्त करण्यात आला आहे.

या अतुलनीय सुवर्णनिर्मितीबद्दल सांगताना श्री. श्‍लोक रांका, (गशुशश्रश्रशीू ऊशीळसपशी रीं ठ-छघ- गएथङङएठड) यांनी सांगितले की, आत्ता आम्ही घडविलेला नेकलेस (चोकर) कम गोल्डन मास्क हे आमच्यासाठी तसे आव्हानच होते. यासाठी आमच्या कारागिरांनी 22 कॅरेट सोन्याचा वापर करत मोठ्या हस्तकलाकुसरीने हा मास्क घडविला असून तो पुन्हा पुन्हा वापरता येऊ शकतो. याचे वजनही 124.5 ग्रॅम इतके अल्प ठेवण्यात आम्हांला यश मिळाले. एवढंच नव्हे तर हा सोनेरी मास्क लवचिक असून कोणत्याही व्यक्तीला व्यवस्थितपणे परिधान करता येऊ शकतो. या मास्कमधून श्‍वास घेता यावा यासाठी सोन्याच्या बारीक जाळ्यांची खास निर्मिती करण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे डिझाईन हे टर्किश स्टाईलमध्ये पाहावयास मिळते. हा मास्क स्वच्छ करण्यासाठी आम्ही खास असा ङ्गयुव्ही सॅनिटायझर बॉक्सफ ग्राहकांना भेट म्हणून देतो.

मास्क व नेकलेसचा (चोकर) संगम असलेली ही सुंदर कलाकृती आत्तापर्यंत जगात कोणीही घडवली नसेल. हा मास्क बनविण्यासाठी कारागिरांना 2 आठवडे लागले. या अप्रतिम आणि अद्वितीय सोनेरी मास्कची किंमत रू. 6.5 लाख इतकी आहे.रांका ज्वेलर्सच्या बंडगार्डन शोरूममधील कलाकारांच्या टीमने ही अनोखी किमया घडवलेली आहे.

 

अवश्य वाचा

बदनामी प्रकरणी आठ आरोपींवर

उरण तालुक्यात वीज पुरवठा....