Wednesday, December 02, 2020 | 01:45 AM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

प्रबोधनात्मक कार्यक्रमाने वर्षावासाची सांगता
रायगड
31-Oct-2020 05:29 PM

रायगड

पाली/बेणसे 

रमाई महिला मंडळ व बौध्दजन समाज सेवा संघ सिध्दार्थनगर बेणसे यांच्या वतीने नालंदा बुध्दविहारात अश्‍विनी पोर्णिमा वर्षावास समाप्ती कार्यक्रमाचे आयोजन  केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कांचन चंद्रकांत अडसुळे यांनी भूषविले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन  करण्यात आले. त्रिसरण पंचशीलचे ग्रहण करून वर्षावास व अश्‍विन पोर्णिमा या विषयावर ममता शेखर भगत यांनी मनोगत व्यक्त केले. तथागत भगवान गौतम बुद्धांचे विज्ञानवादी, समतावादी तत्वज्ञान जगाला तारणारे आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दिक्षाभूमीत लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली व धम्मचक्र गतिमान केले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बहुजन महापुरुषांची चळवळ अधिकाधिक गतिमान करण्यासाठी योगदान देण्याचा संकल्प याप्रसंगी एकजुटीने करण्यात आला.

 या कार्यक्रमात चंद्रकांत अडसुळे, शैलेश शेलार यांनीसुद्धा मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य संतोष अडसुळे, भगवान शिंदे, समीर अडसुळे, सहदेव भगत, आदित्य भगत, रमाई महिला मंडळाच्या सुमन अडसुळे, नंदाबाई अडसुळे, कल्पना अडसुळे, चंद्रभागा अडसुळे, आरती भगत, आशा शिंदे, आशा भगत, माधुरी अडसुळे, ताराबाई अडसुळे, संजीवनी अडसुळे, मनिषा अडसुळे, छाया सावंत, अनुसया सावंत, आम्रपाली सावंत,  सुषमा अडसुळे, लिला एटम, कविता अडसुळे, शुभांगी अडसुळे, अर्चना अडसुळे, पूनम सावंत, रंजना भगत, कविता अडसुळे, नंदा भगत, तेजस्वीनी सावंत, अमृता शिंदे  आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सोनाली शिंदे यांनी केले.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top