नागाव

 रायगड जिल्ह्यातील 28 पोलिस ठाण्याच्या अखत्यारित वाहतूक शाखेने एका दिवसात कोरोंनाच्या काळातील नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहन चालकांवर कारवाई करीत 457  केसेस दाखल केल्या असून वाहन चालकांकडून  98  हजार 500 रूपये दंडत्मक रक्कम वसुल केली आहे. काही वाहन चालक शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लघंन करीत असल्याचे निदर्शनात आल्यास त्याची वेळीच दखल घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून समज देऊन सोडण्यात येत होते.   काही वाहन चालक नियम पायदळी तुडवित रस्त्यावरून वाहन चालवित आहेत. अशा  दुचाकी, तिनचाकी व चारचाकी वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई केली.  

 

अवश्य वाचा

देशात 61 लाख कोरोनाबाधित

मधुकर कदम यांचे निधन