Wednesday, December 02, 2020 | 03:01 AM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

रायगड वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढणार
रायगड
25-Oct-2020 09:48 PM

रायगड

अलिबाग 

राज्यात वन स्टेट वन ई-चलान मोहीम पोलीस दलाकडून राबविण्यात येत आहे. पण ही ई- चलान मोहीम आता पोलिसांनाच डोकेदुखी ठरू लागली आहे. या मोहिमेतंर्गत पोलीस नियम मोडणाऱया चालकांवर धडक कारवाई करीत आहेत. पण असे असताना राज्यात अनपेड चलान केसेसची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत आहे. केलेल्या केसेसची कोटयवधी रुपये दंड वसुली करणे बाकी असून जर वेळेत ती केली नाही तर चलानच्या दंडाच्या रकमेचा आकडा आणखी मोठा होईल अशी चिंता पोलिसांना लागून राहिली आहे.

वाहतुकीचे निमयम मोडणाऱया चालकांविरोधात पोलिसांकडून राज्यभरात ङ्गवन स्टेट वन ई-चलानफ मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेतंर्गत रायगड जिल्हा पोलिस हददीतील चालकांविरोधात 1 लाख 20 हजार 711 इतके ई-चलान पेंडिंग असून त्या चलानची दंडाची रक्कम 2 कोटी 99 लाख 24 हजार 800 रुपये इतकी आहे.

लॉकडवून काळात बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी रायगड पोलिसांनी कडक अमलबजावणी केली. त्यामुळे दंडाची रक्कम देखील वाढली. मार्चपासून 3 कोटीपर्यंत दंड करण्यात आला. तर 1 जानेवारी ते 22 ऑक्टोबर 2020 या कालावधीत 1लाख 55 हजार 451 चलन आकारण्यात आले. त्याची रक्कम 3 कोटी 86 लाख 48 हजार 600 रुपये इतकी आहे. त्यापैकी 34 हजार 740 चलनाचे 87 लाख 23 हजार 800 रुपये रोख रकमेच्या स्वरूपात वसूल करण्यात आले. मात्र 1लाख 20 हजार 711 चलनाचे 2 कोटी 99 लाख 24 हजार 800 रुपयांचा दंड वसूल होणे बाकी आहे. हा दंड वसूल करणे पोलिसांसमोर डोकेदुखी झाली आहे.

अनेकदा वाहन चालकांना दंड केल्यानंतर त्याच्याकडे पैसे नसल्याने कारवाई करताना ईचलन आकारून सोडून देण्यात येते. मात्र सदर रक्कम वाहन चालकाकडून जमा केली जात नाही. अनेक चालकांना अचानक दंडाचा आकडा समजतो

आपल्यावर झालेल्या ई-चलानची बहुतेक चालकांना माहितीच नसते, परंतु कधी नियम मोडताना चालक रंगेहाथ पकडला गेला की त्याच्यावर किती ई-चलानच्या केसेस आहेत आणि किती दंड झाला आहे ते तेव्हा समजते. असा प्रकार सध्या सर्रास होत आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top