Monday, March 08, 2021 | 08:16 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

लसीकरणासाठी रायगड सज्ज
रायगड
13-Jan-2021 08:31 PM

रायगड

 । अलिबाग ।  विशेष प्रतिनिधी ।

कोरोना लसीकरण मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज होत आहे. कोरोना लस उपलब्ध झाल्यानंतर ती लस डीप फ्रीजमध्ये ठेवण्यासह ग्रामीण भागात वितरीत करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. लस साठवणूक, नियंत्रण व वितरणाच्या वेगवेगळ्या टप्प्याचा डेमो व कार्यपद्धतीबाबत आरोग्य कर्मचारी आणि यंत्रणेला प्रशिक्षण दिले गेले आहे. 16 जानेवारीपासून लसीकरणाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे.

रायगड जिल्ह्यात एका वेळी 8 हजार 55 लीटर लस साठवणूक करण्याची क्षमता आहे. लसीकरण करण्यासाठी सुरुवातीला रायगड जिल्ह्यातील एक जिल्हा शासकीय रुग्णालय, 6 उपजिल्हा रुग्णालय, 52 प्राथमिक आरोग्य केंद्रांसह 8 ग्रामीण रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र स्थापन करण्यात येईल. ऑनलाइन नोंदणी करून ती यादी सरकारकडे सादर केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 8 हजार 895 जणांना लस दिली जाणार आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर या सर्वांचे आधारकार्ड व इतर पुरावे पाहून त्यांना लस दिली जाणार आहे. 

जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन व जिल्हा परिषद आरोग्य विभाग हातात हात घालून कोरोना लसीकरण मोहिमेची तयारी करीत असल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिली आहे.जिल्हा आणि तालुकास्तरावर याबाबत नियोजन व अंमलबजावणी करण्यात येणार असून दोन्ही स्तरावर साप्ताहिक आढावा घेतला जाणार आहे. या अनुषंगाने करावयाची पूर्व तयारी, प्रत्येकाची जबाबदारी, लसीकरणासाठीचे प्रशिक्षण, संबंधितांची भूमिका, आवश्यक साधनसामुग्री, जागेची निवड, उद्भवणार्‍या समस्या, प्रत्यक्ष अंमलबजावणीतील आव्हाने याबाबत आरोग्य यंत्रणा सतर्क असून, या सर्व बाबी लक्षात घेऊन लसीकरणाचे नियोजन करण्यात येत आहे.

लसीकरण मोहिमेच्या तयारीवर पालकमंत्री आदिती तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक सुहास माने, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे लक्ष ठेऊन आहेत.

साठवणूक क्षमता

जिल्ह्यात एका वेळी 8 हजार 55 लीटर लस साठवणूक करण्याची क्षमता आहे. लसीकरण करण्यासाठी सुरुवातीला रायगड जिल्ह्यातील एक जिल्हा शासकीय रुग्णालय, 6 उपजिल्हा रुग्णालय, 52 प्राथमिक आरोग्य केंद्रासह 8 ग्रामीण रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र स्थापन करण्यात येईल. तसेच आवश्यकतेनुसार केंद्र वाढविली जाणार आहेत. लस साठवणूक करण्यासाठी जिल्ह्यात शीतसाखळी तयार करण्यात आली आहे. लस ठेवण्यासाठी 109 आईस लाईन फ्रीझर, लस थंड तापमानात साठवून ठेवण्यासाठी 98 डीप फ्रीझर, कोल्ड बॉक्स, वॅक्सिन करिअरसह यंत्रणा सज्ज आहे.

लसीसाठी ऑनलाईन नोंदणी

पहिल्या टप्प्यात एकूण  8 हजार 895 जणांना लस देण्यात येणार आहे. त्या सर्वांचे आधारकार्ड व इतर पुरावे पाहून त्यांना लस दिली जाणार आहे. लसीकरणासाठी कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

लसीकरणाचे टप्पे

पहिला टप्पा

डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, सेवक, पॅरामेडीकल स्टाफ, आरोग्य केंद्रावर येणारे इतर संबंधित या सर्व शासकीय, खासगी, शहरी, ग्रामीण, सर्व आरोग्य क्षेत्राशी निगडीत कर्मचारी.

दुसरा टप्पा

पोलीस, सुरक्षा रक्षक, होमगार्ड, सॅनिटायझर वर्कर, मनपा यासह प्रत्यक्ष फिल्डवर कार्यरत असणारे लोक.

 

 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top