अलिबाग

रायगड जिल्ह्यातील कोराना रुग्णांची संख्या कमी होण्याची नाव न घेता दिवसेंदिवस वाढतच आहे.  शनिवारी आढळलेल्या 361 नवे रुग्ण, 12 जणांचा मृत्यू  तर 361 कोरोनामुक्त रुग्णानंतर रायगड जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 18 हजार 137 वर जाऊन पोहोचली आहे. 

नव्याने आढळलेल्या 361 रुग्णांमध्ये पनवेल मनपा क्षेत्रात 156 तर पनवेल ग्रामीण 52, उरण 9, खालापूर 22, कर्जत 11, पेण 29, अलिबाग 17, माणगाव 13, मुरुड 3, रोहा 21, श्रीवर्धन 3,  महाड 24 तर पोलादपर 1 अशा रुग्णांचा समावेश आहे. तर उपचार सुरु असलेल्यांपैकी  पनवेल मनपा क्षेत्रातील 5, पेण 2, अलिबाग  2, मुरुड, माणगाव व श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येकी  1 अशा 12 जणांचा जिल्ह्यात मृत्यू झाला.

बरे झालेल्या रुग्णांमध्ये आज पनवेल मनपा क्षेत्रात 121, ग्रामीण 51,  उरण, 22, खालापूर 27, कर्जत 18, अलिबागच्या 22, तसेच पेण 19, मुरुड 23, माणगाव 10, रोहा 5, श्रीवर्धन 2, म्हसळा 6, महाड 34 पोलादपूर 1 अशा एकूण 361 जणांना बरे वाटल्याने घरी सोडण्यात आले.

अवश्य वाचा

राज्यभरात पावसाचा धुमाकुळ

नेरळ रेल्वे गेट 21 पासून बंद