महाड

कोरानानंतर चक्रीवादळाचे संकट समोर असताना त्याला सामोरे जात असताना राज्य शासनाच्या पुर्व परवानगीने जेष्ठ शुध्द त्रयोदशी (गुरुवार) तीथी प्रमाणे कोकण कडा मित्र मंडळ या शिवप्रेमी संस्थे तर्फे शिवराज्यभिषेक दिन किल्ले रायगडावर अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी मोजकेच शिवभक्त उपस्थित होते.
लॉकडाऊनमुळे यावर्षी किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा होणार किंवा नाही याबद्दल शिवभक्तांमध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण झाली होती. याचवेळी महाडमधील कोकण कडा मित्र मंडळ या शिवप्रेमी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयाचा आधार घेत शिवभक्तांनी  छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा घरीच साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला चांगला प्रतिसाद लाभल्याने लाखो शिवभक्तांनी गडावर साजरा करण्यात येत असलेला सोहळा आपल्या घरांमध्ये बसुन पहाण्याचा आनंद घेतला.
पहाटे किल्ले रायगडावरील श्री शिरकाई देवीची पुजा करण्यात आली. त्यानंतर श्री जगदीश्‍वर मंदिरात विधीवत पुजन आणि अभिषेक करण्यात आला. राजदरबार येथे सालाबादाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करण्यात आले. यावेळी राज पुरोहित प्रकाशस्वामी जंगम उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार यांच्या हस्ते सुवर्ण मुद्रा अभिषेक  करण्यात आला. यावेळी उपस्थित शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत त्यांना अभिवादन केले.
किल्ले रायगडावरील दोन दिवसाचा नियोजित कार्यक्रम कोकण कडा मित्र मंडळाच्या फेसबुकवर ठिकठिकाणी लाईक दाखविण्यात आला. यामध्ये महाडवरुन प्रतिक कालगुडे,वीड वरुन सुप्रसिध्द गायक अभिजीत जाधव यांचा शाहिरी कार्यक्रम,पनवेल वरुन शाहिर वैभव घरत यांचा कार्यक्रम,नागपुर वरुन डॉ.सुमंत टेकाडे यांचे व्याख्यान,अलिबाग वरुन रोहित पाटील यांचा गायनाचा कार्यक्रम पेैसबुक वरुन लाईव करण्यांत आला असल्याची माहिती सुरेश पवार यांनी दिली.
हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर अत्यंत साधे पणाने शिवराज्यभिषेक दिन साजरा करण्यांत आल्याने गडावर मर्यादीत शिवभक्ताना जाण्याची परवानगी देण्यांत आली होती.देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आणि 3 जुन रोजी चक्रीवादळाने घातलेल्या थैमाना मुळे सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले होते.तीथी प्रमाणे गडावर जरी शिवराज्यभिषेक दिन साजरा करण्ंयात आला असला तरी सर्व नियमांचे पालन करीत शिवभक्त आमदार भरत गोगावले यांनी रायगडाच्या पायथ्याशी चित्त दरवाज्याशी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार अभिवादन केले.त्याच प्रमाणे महाड शहरांतील शिवाजी चौक येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार,शिवेनेचे तालुका प्रमुख सुरेश महाडीक,विरोधी पक्ष नेते चेतन पोटफोडे,नगरसेवक डॉ चेतन सुर्वे,सिध्देश पाटेकर,प्रणव दळवी,आर्ते  यांच्यासह असंख्य शिवभक्त उपस्थित होते.
किल्ले रागयड परिसरांमध्ये चक्रीवादळामुळे ग्रामस्थांचे प्रचंड नुकसान  झाले असल्याने आमदार गोगावले यांनी आज नुकसानीची पहाणी केली.प्रशासनाने त्वरीत नुकसानीचे पंचनामे करुन घ्यावेत असे आदेश त्यानी यावेळी दिले.नेवळेवाडी,हिरकणीवाडी,रायगडवाडी,बांधणीचा माळ,पुनाडे,वाळसुरे,पाचाड या गावांना भेट देऊन नुकसानीचे पाहाणी केली. या मध्ये शेतीचे देखिल मोठे नुकसान झाले असल्याचे आढळून आले,शासनाने नुकसान ग्रस्त शेतकछयांना तातडीने मदत करावी अशी मागणी आ.गोगावले यानीं केली आहे.


अवश्य वाचा

देशात 25 हजार रुग्णांची वाढ