अलिबाग 

रायगडावरील कोरोनाचे मलभ दुर होण्याऐवजी ते अजूनच घट्ट होत असल्याने चिंता वाढली आहे. जिल्ह्याभरात आज 613 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 26 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण मृत्यूंची संख्या 1 हजार 159 झाली आहे. तर एकूण रुगणसंख्या 43 हजार 79 वर जाऊन पोहचली आहे. आज बरे झालेल्या 743 रुग्णांसह आतापर्यंत 36 हजार 693 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 5 हजार 227 जणांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी 3 हजार 516 जण गृहविलगीकरणात आहेत. तर 343 डेडिकेटेड कोव्हीड 19 हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. 641 जण डेडिकेटेड कोव्हीड 19 हेल्थ सेंटर आणि 417 जण कोव्हीड 19 केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

नवीन रुग्णांमध्ये पनवेम मनपा क्षेत्रामध्ये 273 पनवेल ग्रामीण 53, उरण 19, खालापूर 19, कर्जत 17, पेण 58, अलिबाग 68, मुरुड 20, माणगाव 29, तळा 1, रोहा 32, सुधागड 1, श्रीवर्धन 2, म्हसळा 1, महाड 18 तर पोलादपूर 2 असा समोवश आहे. तर 26 मृत रुग्णांमध्ये पनवेल मनपा क्षेत्रात 10, कर्जत, पेण, माणगाव आणि रोहा या चार तालुक्यात प्रत्येकी 3, खालापूरमध्ये 2 तर महाड व पोलादपूर तालुक्यात येथे प्रत्येकी एक रुग्ण दगावले. शासनाने कोरोनामुक्त ठरवलेल्या 743 रुग्णांमध्ये पनवेल मनपा क्षेत्रातील 220, पनवेल ग्रामीण 111, उरण 28, खालापूर 20, कर्जत 39, पेण 59, अलिबाग 103, मुरुड 5, माणगाव 61, तळा 21, रोहा 21, सुधागड 1, श्रीवर्धन 4, म्हसळा 7, महाड 27 तर पोलादपूर तालुक्यातील 16 रुग्णांचा समावेश आहे.

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त