अलिबाग 

अरबी समुद्रकिनारपट्टीवर घोंगावणाऱ्या निसर्ग चक्रीवादळ  रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, मुरुड, अलिबाग परिसरातील समुद्र किनाऱ्याजवळ असतानाच जिल्हा  प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत १८ तासात  जिल्ह्यातील सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेल्या नागरिकांचा आकडा १३ हजार २४५ वर पोहचला आहे. नागरिकांना सुरक्षेच्यादृष्टीने शाळा, मंगल कार्यालय, समाजमंदिरांमध्ये हलवण्यात आले आहे. 

जिल्ह्यात दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली असून निसर्ग चक्रीवादळ हे अलिबाग समुद्रकिनारी येणार असल्याचे समजताच प्रशासनाकडून वेगवान हालचाली करण्यात आल्या. एकट्या अलिबाग तालुक्यात एनडीआरएफच्या तीन तुकड्या आल्या असून त्यांनी समुद्र किनारी गावातील परिस्थितीची पाहणी केली आहे.

अलिबाग तालुक्यातील ४ हजार ५८७, पेण ८७, मुरुड ३ हजार २३५, उरण १ हजार ८९९, पनवेल ५५, श्रीवर्धन, ३ हजार ३४३, म्हसळा २३९  अशा १३ हजार २४५ नागरिकांना जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासनाच्यावतीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. या नागरिकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

अवश्य वाचा

देशात 25 हजार रुग्णांची वाढ