अलिबाग 

कोरोनाचे चार नवीन रुग्ण आढळून आल्याने तालुक्यातील रुग्णांची संख्या 119 वर पोहचली आहे. यात पंतनगर येथील 1, वेलवली येथील 1 आणि नवेनगर पोयनाड येथील आरोग्यसेविकेसह तिच्या मुलाला कोरोनाचा संसर्ग झाली आहे. त्यामुळे तालुक्यात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या 119 वर पोहोचली आहे. दिलासादायक म्हणजे उपचार सुरु असलेल्या रुग्णांपैकी 13 जणांचे अंतिम रिर्पोट निगेटिव्ह आल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आले.

तालुक्यातील चेंढरे-पंतनगर येथील एका 62 वर्षीय वृद्ध व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. तर वेलवली येथील एका 23 वर्षांच्या तरुणाला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. हे दोन्ही रुग्ण आजारी असल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोना सदृश्य लक्षणे असल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यांचा रिपोर्ट आज पॉझिटीव्ह आला असून, या दोघांनाही कोविड-19 विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

तर नवेनगर पोयनाड येथे दोघांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आरोग्यसेविका असलेल्या 53 वर्षीय महिलेसह तिच्या 30 वर्षीय मुलाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या दोन्ही रुग्णांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. चारही रुग्णांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.

त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब म्हणजे आज 13 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. यात शहापूर येथील 4, रांजणखार येथील 3, गोंधळपाडा येथील 1, मुळे येथील 1, हाशिवरे येथील 2, शिरवली येथील 1 आणि अलिबाग कोळीवाडा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. या रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान, तालुक्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 119 वर पोहोचली आहे. यापैकी 6 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 63 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सद्यस्थितीत 50 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अवश्य वाचा

रत्नागिरीत मुसळधार पाऊस