सुतारवाडी  

 सध्या लॉकडाऊन काळात अनेक ठिकाणची एटीएम बंद अवस्थेत आहेत. रोहा शहरातील मोजकीच एटीएम कार्यरत असून इतर बंद अवस्थेत असल्यामुळे अनेकांची मोठी कुचंबणा होत आहे. ज्याठिकाणी एटीएम चालू आहे अशा ठिकाणी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत.

कोलाड नाक्यावर एकूण तीन एटीएम आहेत. एक पेट्रोल पंपासमोर बँक ऑफ महाराष्ट्रचा,  दुसरा भारतीय स्टेट बँक आणि तिसरा बँक ऑफ इंडियाचा. मात्र बँक ऑफ इंडिचा एटीएम अनेक दिवसांपासून बंद असून ग्राहकांची निराशा होत आहे. बँक ऑफ इंडियाचा एटीएम बंद असल्यामुळे स्टेट बँकेच्या एटीएमवर मोठ्या रांगा दिसत आहेत. कोरोनामुळे डिस्टन्सचे नियम पाळणे गरजेचे आहे हे नियम पाळत अनेक ग्राहकांच्या लांब रांगा दिसत असतात. बँक ऑफ इंडिया शाखा कोलाड बद्दल अनेकांची नाराजी व्यक्त केली आहे. या बँकेत मॅनेजर सुद्धा व्यवस्थित नागरिकांना प्रतिसाद देत नसल्याची चर्चा सध्या चालू आहे. बँक ऑफ इंडियाचे एटीएम त्वरित सुरु करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

अवश्य वाचा

बदनामी प्रकरणी आठ आरोपींवर

उरण तालुक्यात वीज पुरवठा....