पाताळगंगा 

सर्वत्र शेतीची कामे पूर्ण झाल्यामुळे आदिवासी बांधवांच्या हाताला काम मिळेनासे होत असल्यामुळे पावसाळ्यात निर्माण झालेले गवत आदिवासींना रोजगार मिळून देत आहे.

ग्रामीण भागात शेतजमीनीशिवाय बराचसा भाग ओसाड असतो. याच ओसाड जमिनीवर उगवणारे गवत कापून ते विक्री करीत असल्याचे चित्र सध्या तालुक्याच्या ठिकाणी पहावयास मिळत आहे.             कोरोनाच्या पाश्‍वर्भूमीवर आदिवासींच्या रोजगाराची प्रश्‍न निर्माण झाला आहे. मात्र दरवर्षी पावसाळ्यात तयार होणार्‍या गवतामुळे आदिवासींच्या रोजगाराचा प्रश्‍न सुटतो. सध्या गवताला मोठी मागणी असल्यामुळे रस्त्याच्या बाजूला निर्माण झालेले गवत आदिवासी कापून त्याची विक्री करीत आहेत. शहरातील मोठे पशुपालक मोठया प्रमाणात गवताची खरेदी करत असून यातून आदिवासींना रोजगार मिळतो आहे.

आदिवासी समाज हा दुर्गम अशा डोंगराळ भागामध्ये राहतो. मात्र पावसाळ्यात या माळरान अथवा डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणावर गवत निर्माण होत असते. त्याचबरोबर ज्या शेतामध्ये लागवड केली नाही त्याठिकाणी गवत निर्माण होत असते. त्याची विक्री करून आदिवासी दैनंदिन खर्च भागवत आहेत.

 

अवश्य वाचा