अलिबाग  

प्रमुख 11 राष्ट्रीय संघटनांनी दिनांक 22 रोजी पुकारलेल्या देशव्यापी आंदोलनात  रायगड जिल्ह्यातील  सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद महासंघ कर्मचारी  सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांच्याकडे संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटने चे रायगड जिल्हा सरचिटणीस प्रभाकर नाईक, सह चिटणीस रत्नाकर देसाई, अलिबाग तालुका अध्यक्षा प्रणाली म्हात्रे, सह चिटणीस निला देसाई आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सर्वांना जुनी पेन्शन मिळावी, सर्व कर्मचार्‍यांना आरोग्य सुविधा मिळाव्यात, खाजगीकरण करु नये इत्यादी मागण्यांचे निवेदन या वेळी देण्यात आले. केंद्राचा पीएफआरडी कायदा रद्द करून सर्वांना जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करावी. कामगार कायद्यांत बदल करून कामगार विरोधी कायदे करू नका. केंद्र व राज्य सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन व भत्ते कपात करू नये. कोरोनाच्या नावाखाली केंद्र सरकारने/ राज्य सरकारने खाजगीकरणाला गती देऊ नये. कर्मचार्‍यांना आरोग्य सुविधा, विमा सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. आदी मागण्यांचा यात समावेश आहे.

 या प्रमुख मागणीसाठी रायगड जिल्हा समन्वय समिती अध्यक्ष विलास तेंडुलकर, सरचिटणीस सुरेश पालकर, मध्यवर्ती संघटना जिल्हा अध्यक्ष संदीप नागे, उपाध्यक्ष परशुराम म्हात्रे जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ रायगड जिल्हा अध्यक्ष डॉ. कैलास चौलकर  यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

सध्या कोरोंना चा असलेला प्रादुर्भाव व त्या अनुषंगाने विविध विभागातील कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत.  कोरोना बाबतचे  गांभीर्य असल्याने सर्व करणाच्यार्‍या नी कार्यरत राहून आंदोलन केले. कोठेही घोषणा, निदर्शने केली नाही. आपले दैनंदिन कर्तव्य बजावत असताना हे आंदोलन केले व जिल्हाधिकारी तसेच तालुका स्तरावर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

 

अवश्य वाचा

आज पासून नवी सुरुवात!