पाली/ वाघोशी 

राजगृहावरील निंदनीय आणि संतापजनक हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडी सुधागड तालुक्याच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. या हल्ल्यातील माथेफिरूवर कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन सोमवारी पाली तहसीलदारांना देण्यात आले.

या घटनेमुळे संपूर्ण जनता ही संतप्त झाली आहे. आधी आंबेडकरी चळवळीचे केंद्र बिंदू असणारे आंबेडकर भवन तोडण्याचा प्रयत्न आणि आता राजगृहावरील हल्ला हे सर्व निषेधार्ह आहेत. हे प्रकार आंबेडकरी जनता सहन करणार नाही असे वंचीत बहुजन आघाडीचे अध्यक्ष अमित निंबाळकर यांनी सांगितले.  यावेळी वंचीत बहुजन आघाडीचे सुधागड तालुकाध्यक्ष अमित गायकवाड, सम्यक विद्यार्थी आंदोलन तालुका अध्यक्ष स्वप्नील गायकवाड व तालुका सरचिटणीस आनंद जाधव यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

अवश्य वाचा

बदनामी प्रकरणी आठ आरोपींवर

उरण तालुक्यात वीज पुरवठा....