Wednesday, May 19, 2021 | 02:06 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

पोलादपूरमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी प्रस्ताव
रायगड
12-Apr-2021 08:06 PM

रायगड

 

। पोलादपूर । वार्ताहर ।

तालुक्यातील पाणी टंचाई आराखड्याला मंजूरी देण्यासाठी प्रयत्न सुरू असताना सद्यस्थितीत 2 गावे आणि 11 वाड्यांमध्ये तीव्र स्वरूपाची पाणी टंचाई भासत असल्याने टँकरद्वारे पाणी टंचाई निवारणासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांमध्ये पोलादपूर तालुक्यातील गेल्या वर्षीची टंचाई निवारणाची बिले अदा केली जाणार असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान, पोलादपूर तालुक्यातील सावित्री नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात टँकरद्वारे पाण्याचा उपसा मुंबई-गोवा राष्ट्रीय महाामार्गाची ठेकेदार असलेल्या एलऍण्डटी कंपनीकडून केला जात असताना सरकारी यंत्रणेकडून कोणत्याही प्रकारे मोजमाप ठेवले जात नसल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

पोलादपूर तालुक्यात पाणीटंचाई दिवसेंदिवस तीव्र होत असताना उत्तरवाहिनी सावित्री नदीचे पात्र उथळ होत आहे. मात्र, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाची ठेकेदार कंपनी मएलऍण्डटीफकडून गेल्या दोन वर्षांत सावित्री नदीपात्रातील दगड गोट्यांचा उपसा मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर तयार झालेल्या डोहामध्ये पुन्हा इतर भागांतून दगड गोटे वाहून आले आहेत. मात्र, या मोठया रूंदीच्या आणि उथळ पात्रांमध्ये जमा झालेल्या पाण्याचादेखील उपसा एलऍण्डटी कंपनीकडून केला जात आहे. स्वामित्वधनापोटी महसूल विभागाने मोठी वसूली केल्यानंतर लघुपाटबंधारे विभागामार्फत एलऍण्डटी कंपनीकडून होणार्‍या पाणी उपशाकडे सपशेल डोळेझाक केली जात आहे.पोलादपूर तालुक्यातील पाणीटंचाई निवारणासाठी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगतच्या 10 किमी. अंतरापर्यंतच्या गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची सामाजिक बांधिलकी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाची ठेकेदार कंपनी एलऍण्डटीकडे सोपविण्याची गरज नजिकच्या काळात असून दरवर्षी दीर्घकाळ बिलाच्या रक्कमेच्या प्रतिक्षेत असलेल्या टँकरमालकांना यामुळे दिलासा मिळणार असून ग्रामस्थांनादेखील पुरेसा पाणीपुरवठा होण्यासारखी परिस्थिती निर्माण होणार आहे.पोलादपूर तालुक्यातील अकरा वाड्यांतून पाणीटंचाईचे प्रस्ताव मंजूरीसाठी जिल्हा पाणीटंचाई निवारणासाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत

कांबळे, इंजिनियर

बांधकाम, आरोग्य विभाग

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top