म्हसळा 

शहरातील डासांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी म्हसळा नगरपंचायतीच्या वतीने धुर फवारणी मशीनची खरेदी करण्यात आली आहे. यामुळे मच्छरांचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होण्याबरोबरच हिवतापासारखे रोगही हद्दपार होण्यास मदत होणार आहे.

म्हसळा नगर पंचायतीने नागरिकांच्या भौगोलिक सुखसोईंकडे चांगल्या प्रकारे लक्ष पुरवून शहरातील नागरिकांना जास्तीत जास्त सोई उपलब्ध होतील याकडे अधिक लक्ष पुरविले आहे.

नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज उकीर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा जयश्री कापरे,उपनगराध्यक्ष सुहेब हालदे, अनुभवी तसेच माजी उपनगराध्यक्ष तथा गटनेते आणि विद्यमान नगरसेवक संजय कर्णिक आणि सर्व नगरसेवक यांच्या सहाय्याने विविध योजना यशस्वीपणे राबवित आहेत.

गेली कित्येक वर्षे शहराला भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न नगरपंचायतीने या वर्षी अगदी सहजपणे हाताळला आणिया वर्षी शहरवासीयांना पाणी टंचाई भासू दिली नाही.कोविड सारख्या महामारीत शहराची स्वच्छता, सातत्याने निर्जंतुकीकरण फवारणी याकडे अधिक लक्ष पुरविण्यात आले.शहरात मच्छरांचा नागरिकांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून त्यापासून अनेक रोग वाढण्याच्या भीतीमुळे नगरपंचायतींने नवीन मच्छर भगावो मशिन खरेदी केली असून त्याची फवारणी संपूर्ण शहरात करण्यात येत आहे.या वर्षी नगरपंचायतीच्या कामगिरीवर नागरिक मात्र समाधानी असल्याची चर्चा शहरात ऐकावयास मिळते.

 

अवश्य वाचा

राज्यभरात पावसाचा धुमाकुळ

नेरळ रेल्वे गेट 21 पासून बंद