नेरळ

 नेरळ गावातील एका तरुणीचा साखरपुडा झाला होता आणि लग्न होण्याआधी नवरा तसेच त्यांच्या कुटुंबीय यांनी मुलीच्या वडिलांकडून पंधरा लाख आणि 25 तोळे सोन्याची मागणी केल्याने ती मागणी पूर्ण होत नाही हर बघून ठरलेले लग्न मोडून टाकण्याची घटना घडली आहे.दरम्यान,या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून कल्याण येथील सहा व्यक्ती या हुंड्याच्या प्रकरणात आरोपी आहेत.

  नेरळ गावातील राजेंद्र गुरू नगर भागातील एका तरुणीचे लग्न कल्याण येथील श्रीकांत प्रल्हाद राठोड या तरुणाबरोबर ठरला होता. त्यांचा साखरपुडा 15 मार्च रोजी झाला होता.त्यावेळी मुलीचे वडील यांनी आपल्या मुलीचा संसार चांगला व्हावा यासाठी दोन लाख एक हजाराची रक्कम हुंडा म्हणून स्त्रीधन या गोंडस नावाखाली दिली होती.साखरपुडा झाल्यानंतर लग्न मे महिन्यात करण्याचे ठरले असल्याने दोन्ही बाजू कडून लग्नाची तयारी सुरू होती.मात्र साखरपुडा झाल्यानंतर कल्याण येथील मुलाकडील मंडळी यांनी मुलीच्या वडिलांकडे 25 तोळे सोने आणि 15 लाख रुपये हुंडा देण्यात यावा अशी मागणी केली.ही मागणी नवरदेव श्रीकांत प्रल्हाद राठोड याने तसेच त्यांचे वडील प्रल्हाद बुधा राठोड,आशा प्रल्हाद राठोड, तसेच नवी मुंबईत राहणारे सरला आर राठोड आणि आर जी राठोड यांच्याकडून मागण्यात आले.मात्र एवढे पैसे देऊ शकत नाही अशी भूमिका नेरळ येथे राहणारे मुलीचे वडील यांनी घेतली.

  त्यामुळे संतापलेल्या नवरदेव असलेला तरुण श्रीकांत राठोड आणि त्या तरुणाचे आई वडील तसेच अन्य दोघांनी नेरळ येथील मुलीच्या घरी येऊन साखरपुडा साठी आलेला आणि लग्नासाठी बुक केलेल्या हॉल आणि अन्य तयारीसाठी आलेला खर्च यांची मागणी केली.25 तोळ्याचे दागिने आणि 15 लाख एवढा  हुंड्याचे स्वरूपात दिले जात नाही हे बघून यांनी मागणी मान्य होत नसल्याने साखरपुडा झालेला असून देखील फिर्यादी तरुणी यांची बदनामी व्हावी या उद्देशाने कल्याण येथील राठोड परिवाराने लग्न मोडून टाकण्याची धमकी दिली.एवढ्यावर ते कुटुंब थांबले नाहीत तर दमदाटी आणि शिवीगाळी करून साखरपुडा समारंभसाठी झालेला खर्च तसेच लग्नाकरिता अडव्हांस म्हणून दिलेला सर्व खर्च असे एकूण 8,10,658 रुपयांची मागणी नेरळ येथील मुलीकडे करण्यात आली.मात्र कोणतीही मागणी पूर्ण होत नसल्याने श्रीकांत राठोड आणि प्रल्हाद राठोड,आशा राठोड, सरला राठोड,आर जी राठोड यांनी संगनमत करून ठरलेले लग्न आणि साखरपुडा  झालेला असून देखील फसवणूक केल्याबद्दल नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

  लग्नाच्या आधी हुंड्यासाठी छळ होत असल्याचा गुन्हा नेरळ पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.  याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात 71/ 2020 भा.दं.वि.420, 406, 500, 506,34 आणि हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961 चे कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तात्या पोसई सांवजी हे करीत आहेत.

 

अवश्य वाचा

बदनामी प्रकरणी आठ आरोपींवर

उरण तालुक्यात वीज पुरवठा....