अलिबाग  

झिराड येथील स. म. वडके माध्यमिक शाळेतील प्रतिभा कृष्णा चौधरी हिचा दहावीच्या परीक्षेत 96.40 टक्के गुण मिळवून पहिला क्रमांक आल्याबद्दल व तिचा भाऊ प्रतीक कृष्णा चौधरी याचा 89 टक्के मार्क मिळविल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ अलिबाग सी शोअरतर्फे शनिवारी झिराड येथे सत्कार करण्यात आला.

या मुलांचे वडील झिराड येथे पोल्ट्रीमध्ये काम करतात. त्यांची आई चायनीज स्टॉल चालवते.  रोटरी क्लब ऑफ अलीबाग सी शोअरचे अध्यक्ष डॉ. किरण नाबर, कार्यवाह निमिष परब, डॉ. प्रिया पाथरे, उपाध्यक्ष प्रतीक पाटील यांनी झिराडला जाऊन प्रतिभा व प्रतिकचा सन्मानपत्र देऊन सत्कार केला व त्यांना पुढील शिक्षणासाठी रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली. ज्यांंचे समाजासाठी खास योगदान आहे तसेच ज्यांनी आयुष्यात काही खास कामगिरी केली आहे त्यांची दखल घेणे व त्यांचा उचित सन्मान करणे ही रोटरी क्लब ऑफ अलीबाग सी शोअरसाठी समाधानाची बाब आहे, असे डॉ. किरण नाबर म्हणाले. यावेळी स. म. वडके माध्यमिक विद्यालयाच्या संस्थेेचे खजिनदार अरविंद पाटील, मुख्याध्यापिका कामिनी राऊत, तिरलोटकर व भगत हे उपस्थित होते.  

 

अवश्य वाचा

राज्यभरात पावसाचा धुमाकुळ

नेरळ रेल्वे गेट 21 पासून बंद