जेएनपीटी 

उरण पुर विभागातील रहिवाशांना करण्यात येणारा विद्युत पुरवठा मंगळवार 4 आँगस्ट ते गुरुवार 7 आँगस्ट या कालावधीत खंडित झाल्याने या गाव परिसरातील 5 हजार रहिवाशांना पिण्याच्या पाणी टंचाईचा सामना हा कोसळणार्‍या मुसळधार पावसात सहन करावा लागला आहे.

वादळीवार्‍यासह आलेल्या पावसाने उरण तालुक्यात धुमाकूळ घातल्याने उरण शहर, जसखार, चिरनेर सह इतर अनेक गावांत पुर परिस्थिती निर्माण झाली.त्यात महावितरण कंपनीच्या माध्यमातून करण्यात येणारा विद्युत पुरवठा हा ठिक ठिकाणी विद्युत पोल कोसळल्याने खंडित झाला असल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे .तर जेएनपीटी बंदरा प्रमाणे इतर प्रकल्पांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तालूक्यावर ओढवणार्‍या नैसर्गिक संकटाचा आढावा हा उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे हे सध्या घेत आहेत.

मात्र मंगळवारी खंडित झालेला विद्युत पुरवठा हा गुरुवार पर्यंत सुरळीत न झाल्याने उरण पुर्व विभागातील रहिवाशांना करण्यात येणारा पुनाडे धरणातील पाणी पुरवठा हा विद्युत प्रवाहा अभावी गेली तीन दिवस बंद पडला आहे.त्यामुळे उरण पुर्व विभागातील  आवरे,गोवठणे,पाले,पिरकोन,पाणदिवे,सारडे,वशेणी तसेच पुनाडे या गावातील जवळ जवळ 5 हजार रहिवाशांना पावसाळ्यातच पिण्याच्या पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागला आहे.

तरी महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी उरण पुर्व विभागातील रहिवाशांना करण्यात येणारा विद्युत पुरवठा तात्काळ सुरळीत करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी सारडे गावातील सामाजिक कार्यकर्ते जीवन पाटील तसेच आवरे गावातील सामाजिक कार्यकर्ते कौशिक ठाकूर यांनी केली आहे.

अवश्य वाचा

चटका लावून गेलास मित्रा!

पवारांना कोणतीही नोटीस नाही