Thursday, December 03, 2020 | 01:30 PM

संपादकीय

कोरोना उतरणीला?

गेले वर्षभर आपल्या मागे साडेसातीसारखा लागलेला कोरोना आता उतरणीला लागला आहे....

सावरोली खारपाडा रस्त्याची दुरवस्था
रायगड
25-Oct-2020 05:31 PM

रायगड

 पाताळगंगा 

खालापूर तालुक्यातील खारपाडा रस्त्यावरील इसांबा फाटा सावरोली  ते वडगाव वाशीवली रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. 

निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्याच्या नूतनीकरणाला   सुरुवात केली जाईल, आश्‍वासन बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी दिले होते. त्यानुसार  मे 2019 मध्ये  दोन  टप्प्यात काम पूर्ण करण्यात आले. रिलायन्स गेट ते सावरोली चार फाटापर्यत डांबरीकरण अंतिम टप्प्यात आले व इसाबा फाटा ते सावरोली चार फाटा हे अंतर काँक्रेटीकरण करण्यात आले. तरीही या रस्त्यावर काही ठिकाणी पावसामुळे प्रचंड मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर प्रवास करणार्‍या नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून याठिकाणी अपघाताचा धोका वाढला आहे.               सावरोलीे चार फाटा ते  वाशिवलीपर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने येथील प्रवास धोक्याचा झाला होता. या रस्ताबाबत तक्रारी वाढत असल्याने या रस्त्याला सार्वजनिक बांधकाम विभागाचे पनवेल  अधिकारी  सावर्गे कर्जत अधिकारी अजयकुमार सर्वगोड यांनी 7  नोहेंबर 2019 मध्ये भेट दिली होती. त्यानंतर या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले. डांबरीकरणाचा भाग पहिला टप्पा पूर्ण करून दुसर्‍या टप्प्यातील काँक्रेटिकरण करण्यात आले. मात्र यातील काही भागात पावसामुळे पुन्हा खड्डे तयार झाले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top