Tuesday, April 13, 2021 | 12:27 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

पोलादपूरमध्ये पोलिसांचा लाठीचार्ज
रायगड
07-Apr-2021 07:04 PM

रायगड

| पोलादपूर  | प्रतिनिधी |

तालुक्याचे शहर असलेल्या पोलादपूर नगरपंचायत हद्दीमध्ये लॉकडाऊनच्या आदेशांचा विपर्यास प्रशासनाकडून केला गेला असून काय बंद आणि काय सुरू ठेवायचे यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वांबाबत प्रचंड गोंधळाची परिस्थिती दिसून आल्याने काही पोलीसकमाअकडून व्यावसायिकांवर लाठीचार्ज करण्यात आला. यानंतर पोलिसांकडून संपूर्ण बाजारपेठ बंद करण्याचा प्रकार झाला. परिणामी, सर्वच व्यापारीवर्ग रस्त्यावर आला आणि विविध राजकीय नेत्यांच्या मागे उभा राहिला. त्यामुळे एकोपा गमावलेल्या या गटांना पांगविण्यात यशस्वी झालेल्या प्रशासनाबाबत पोलादपूर तालुक्यातील जनतेची मपब्लीक क्राय आऊटफ सारखी जनक्षोभाची परिस्थिती दिसून येत आहे.

मंगळवारी रात्रीपासून पोलादपूर पोलीसांची लॉकडाऊनसाठी मानसिकता उघड होऊन राहत्या घरालगतच दुकान असलेल्या भाजीविक्रेत्यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले होते. रात्री यासंदर्भात चर्चा सुरू असतानाच बुधवारी सकाळी पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागातून पोलादपूर शहराकडे येणार्‍या एस.टी.बसेस, जीप व मिनीडोर आदी वाहनांतून सकाळपासून बाजारहाटासाठी गर्दी सुरू झाली. पोलादपूर तालुक्यात पोलादपूर, लोहारे, कापडे बुद्रुक, पितळवाडी, सवाद, कातळी बंगला या ठिकाणी परिसरातील जनतेच्या बाजारहाटाची ठिकाणे आहेत. पण पोलादपूर शहरामध्ये बँका आणि अन्य सरकारी कार्यालये असल्याने पोलादपूर शहरातील तालुक्याचे ठिकाण म्हणून होणारी गर्दी वाढल्यानंतर पोलीसी खाक्या दाखवून तालुकाभर या कृतीद्वारे लॉकडाऊनच्या दहशतीचा संदेश पोहोचविण्याचा प्रकार पोलादपूर पोलीसांनी बाजारपेठेत तुडूंब गर्दी असताना दाखविला. मात्र, या सर्व प्रकारात सरकारी यंत्रणा कोरोना संसर्गावर कोठेही चर्चा अथवा उपाययोजनेवर भाष्य करताना दिसून येत नव्हती. त्यामुळे कोरोना संसर्गाबद्दल चर्चा न होता केवळ परिपत्रकातील जीवनावश्यक वस्तु व सेवांबाबत बोलणार्‍या प्रशासनाला यापुढे सर्वसामान्यांचे जगणे हेच जीवनावश्यक असल्याचे भान राहिलेले दिसून येत नव्हते. यातून काही दुकानदारांवर लाठीचार्ज तर काही दुकानदारांच्या दुकानातील काचेच्या फर्निचरवर लाठीचार्ज झाल्याने संतापाची भावना वाढीस लागली.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top