माणगांव

माणगाव बाजारपेठेतील रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले असून,याचा त्रास वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात होत आहे. 

  वाहतुक कोंडीने माणगांवकर जनता त्रस्त असताना बाजारपेठेच्या मध्यस्थानी बिकानेर मिठाईवाले दुकानासमोर व हाँटेल ओम माधवाश्रम यांच्यासमोर भले मोठे खड्डे पडले आहेत. यातच ट्राफीक मधुन मार्ग काढत जाणारा दुचाकीस्वार किंवा तीन चाकी वाहन यांचा अपघात दुर्घटना घडणे नाकारता येऊ शकत नाही. 

 माणगांवातील बाजारपेठ मध्यस्थानी रस्त्यावरील खड्डे  दुरुस्ती करुन घ्यावी अशी मागणी  नागरिकांकडुन केली जात आहे. महामार्ग जरी माणगांव शहरातुन बाह्यवळन घेऊन जात असला तरी माणगांव तालुक्याची व तालुक्यातील संपुर्ण ग्रामीण भागाची बाजारपेठ ही माणगांव शहरच असल्याने ग्रामीण भागातील बहुतांशी लोकांची वर्दळ ही माणगांव शहरातच असते.काही नागरिक प्रवासी तीन चाकी वाहन व दुचाकीस्वार यावरुन प्रवास करत असतात. अश्या खड्यातुन अपघात होऊ शकतात.