Thursday, January 21, 2021 | 12:40 AM

संपादकीय

‘बर्ड फ्लू’चा वाढता धोका

संकटं एकटी-दुकटी न येता चोहीकडून येतात आणि घेरुन टाकतात

वॉटर स्पोर्टस्ना ना हरकत
रायगड
01-Dec-2020 08:58 PM

रायगड

 अलिबाग 

पर्यटन व्यवसायाला परवानगी देताना रायगडच्या जिल्हाधिकार्‍यांनी काढलेल्या आदेश पत्रातील एका छोट्याशा शाब्दीक चुकीमुळे जलक्रीडा व्यावसायिकांचा व्यवसाय बुडाला होता. अखेर ही चुक शब्दांच्या रचनेमुळ झालेली आहे, असा खुलासा करत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जलक्रीडा व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे सांगितले आहे.

20 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आदेशपत्रात मसर्व जिल्ह्यातील समुद्रकिनारी चालविले जाणारे विविध जलक्रिडा प्रकारफ असा गोंधळात आणि अर्थ स्पष्ट न होणारा शब्द वापरला होता. वास्तविक, या ठिकाणी मरायगड जिल्ह्यातील सर्व समुद्र किनारेफ असा शब्द वापरणे आवश्यक होता. किनारपट्टीचे जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये समुद्र किनारे नाहीत. त्याचबरोबर मुंबईमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर असल्याने तेथे जलक्रीडा प्रकारांना परवानगी देण्यात आलेली नाही. इतर जिल्ह्यातील समुद्र किनार्‍यावर रायगडच्या जिल्हाधिकार्‍यांना परवानगी देता येत नसल्याने बंदर विभागाने या आदेशाची अंमलबजावणी करण्यास नकार दर्शविला होता. या शब्दीक चुकीमुळे बंदर विभागाने रायगड जिल्ह्यातील जलक्रीडा प्रकारांना परवानगी नाकारली होती. अखेर सोमवारी, सायंकाळी जलक्रीडा व्यावसायिक अलिबाग येथील शिवनाथ पाटील, परेश पाटील, अमित पेरेकर, नागाव येथील प्रफुल्ल बनकर यांनी पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या समक्ष जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची भेट घेत परवानगी मिळण्यासाठी विनंती केली होती. यावेळी हा सर्व  प्रकार शाब्दिक रचनेमुळे झालेला असून बंदर विभागाला याची अंमलबजावणी करणे गरज असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे मागील 20 नोव्हेंबरला आदेश मिळूनही व्यवसाय सुरु न करु शकलेल्या जलक्रीडा व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top