माणगाव 

गेल्या काही दिवसांपासून माणगावसह तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. या कोरोनाच्या संकटात निष्काळजीपणाने वागणार्‍या दुकानदार व नागरिकांविरुद्ध माणगाव नगरपंचायतीने दि. 17 व 18 सप्टेंबर अशा दोन दिवस  कारवाई करून त्यांच्याकडून 12 हजार 200 रुपयांचा दंड वसुल केला. 

ही कारवाई  नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीचे लिपिक मंगेश पाटील,रामदास पवार व सहकार्‍यांनी केली. माणगाव तालुक्यात लॉडाऊनच्या चौथ्या टप्प्यापासून कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर सातत्याने तालुक्यात रुग्ण आढळू लागले. अलीकडच्या काही दिवसांमध्ये तर माणगाव नगरपंचायत हद्दीत तसेच तालुक्यात दररोज 35 ते 40 कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. यापैकी जवळपास 80 ते 90 टक्के रुग्ण हे माणगाव नगरीत आढळत असल्याने नगरपंचायतीने खबरदारीचा उपाय म्हणून बाजारपेठेत केली जाणारी गर्दी व विनामास्क असणारे नागरिक व दुकानदार यांच्यावर विशेष लक्ष दिले आहे. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला असून नागरिकांकडून दंड वसुली केली जात आहे.

 

अवश्य वाचा