Thursday, January 21, 2021 | 12:27 AM

संपादकीय

‘बर्ड फ्लू’चा वाढता धोका

संकटं एकटी-दुकटी न येता चोहीकडून येतात आणि घेरुन टाकतात

आधीची थकबाकी द्या,मगच भातखरेदी करा
रायगड
01-Dec-2020 08:36 PM

रायगड

नेरळ 

 कर्जत तालुक्यात शेतीच्या माध्यमातून बहुतांश शेतकरी भातपिकाचे उत्पन घेतात.या पिकविलेल्या उत्पादनाला चांगला मोबदला मिऴावा म्हणून शासनाने भात खरेदी केंद्राची संकल्पना राबवून शेतकर्‍याचा भात थेट या केंद्रात खरेदी केला जाऊ लागला.परंतु गेल्या वर्षभरापासून नेरळ आणि परिसरातील 12 शेतकरी नेरळ येथील भात खरेदी केंद्रात आपल्या विक्री केलेल्या भाताचे पैसे मिळावे म्हणून चकरा मारत असून त्यांना वर्षभर वेगवेगळी कारणे आणि उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने हे सर्व शेतकरी आंदोलनाच्या पवित्रात असून जोपर्यत पैसे मिळत नाहीत तोपर्यत केंद्रात नवीन भात खरेदी करू देणार नाही असा इशारा दिला आहे.

 शासनाच्या माध्यमातून हमखास चांगला भाव आणि पैसेही हमखास मिळणार या आशेवर चांधई,कोदिवले, बार्डी, नेरळ, कळंब, उकरूळ, चिंचवली,तळवडे,भडवळ,बोरगाव, माणगांव, वंजारपाडा या गावातील 12 शेतक-यांनी मागील वर्षी आपले भात या केंद्रात विक्री केली. सदर शेतक-यांनी यावेळी बँक खात्याची माहितीही जमा केली आणि शेतक-यांना भातविक्रीचा मोबदला त्यांच्या खात्यात जमा होईल असे सांगण्यात आले.परंतू,काही तांत्रिक अडचणी,चुका केंद्राकडून झाल्याने शासनाकडून पैसे आजपर्यत येऊ शकले नाहीत. वर्षभरात शेतकर्‍यांना आपल्या कष्टाचे पैसे मिळत नसल्याने शेतकर्‍यांनी आंदोलनांचा प्रवित्रा घेतला असून जोपर्यंत आमचे पैसे आम्हाला मिळत नाही तो पर्यंत तालुक्यात भात खरेदी केंद्र सुरू करू देणार नसल्याची भूमिका घेतली आहे.

 गेल्या वर्षभरापासून आम्ही सर्व शेतकरी वेळोवेळी नेरळ येथील भात खरेदी केंद्रात पैसे कधी मिळणार याबाबत पाठपुरावा करत असून आम्हाला प्रत्येकवेळी नवनवीन कारणे दिली जात आहेत.कधी मशीनमध्ये खराबी आहे.कधी खातेक्रमांक चुकीचा दिला आहे, कधी नाव चुकीचे आहे अशी विविध कारणे दिली जात आहेत. गेल्या वर्षभरापासून कोविड सारख्या महामारीच संकट आले. अवकाळी पावसामुळे भातपिकाचे नुकसान झाले यामुळे आमच्या हक्काच पैसे असूनही आम्हाला वर्षभर हेलपाटे मारावे लागत असून अजूनही  पैसे कधी मिळणार याबाबत कोणतेही ठोस आश्‍वासन मिळत नाही. आमचे पैसे जोपर्यत आम्हाला मिळत नाही तोपर्यत आम्ही केंद्राला नवीन भात खरेदी करून देणार नाही.

 वसंत अनाजी चहाड (शेतकरी कोदिवले

या शेतकर्‍यांचे पैसे काही तांत्रिक अडचणीमुळे अडकले असून आम्ही या शेतकर्‍याची थकबाकी लवकर मिळावी यासाठी प्रयत्न करत आहोत. पंरतू, अलिबाग येथे वेळोवेळी पाठपुरावा करूनही वेगवेगळ्या तांत्रिक बाबी 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top