Monday, January 18, 2021 | 04:01 PM

संपादकीय

ड्रायव्हरलेस मेट्रोचं लक्षवेधी तंत्र!

किंबहुना, असं म्हणणार्‍यांना वेड्यात काढलं गेलं असतं.

पंडीत पाटील यांची कापोली जाकमाता मंदिराला भेट
रायगड
13-Jan-2021 03:20 PM

रायगड

। बोर्ली पंचतन । वार्ताहर ।

 श्रीवर्धन तालुक्यातील कापोली, शिस्ते भावे गावच्या जाकमातेच्या कड्यावर असणार्‍या जाकमाता मंदीराला बुधवारी शेकापचे नेते पंडीत पाटील व त्यांच्या पत्नी जिल्हा परीषद सदस्य भावना पाटील यांनी भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी जाकमातेच्या कड्यावर शिस्ते, कापोली व भावे या तिन्ही गावचे कार्यकर्ते तसेच मंदीराचे ट्रस्टी यांनी उभयतांचे शाल, पुष्प देऊन सत्कार केला.यावेळी सरपंच चंद्रकांत चालके, शिस्ते सरपंच तसेच स्वप्निल बिराडी माजी सरपंच (गोंडघर) व प्रमोद नाक्ती शिस्ते युवा नेते यांचासुद्धा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.उपस्थित कार्यकर्ते तिन गाव देऊळ कमिटी अध्यक्ष योगेश धुमाळ, उपाध्यक्ष सशिकांत सुखदरे, सचिव दत्तात्रय भायदे, खजिनदार संतोष कांबळे, सहखजिनदार संतोष धुमाळ, कापोली गावचे अध्यक्ष परशुराम  पाटील, सहसचिव प्रशांत पाटील, ग्रा.पं सदस्य वसंत कांबळे, सदस्य दिपेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी पंडीत पाटील यांनी मंदीराच्या विकासकामासाठी पाच लाख रूपयांचा निधी देण्याचे जाहीर केले व या मंदिराच्या विकासकामांसाठी आपण अग्रेसर राहु असे आश्‍वासन उपस्थित तिनही गावच्या पदाधिकार्‍यांना दिले.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top