Tuesday, April 13, 2021 | 12:42 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

अंजनवेल ग्रामपंचायतीला पंचायत सशक्तीकरण पुरस्कार
रायगड
06-Apr-2021 07:42 PM

रायगड

गुहागर। वृत्तसंस्था ।

केंद्र शासनातर्फे अंजनेवल ग्रामपंचायतीला दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार मिळाला आहे. यावर्षी (पडताळणी वर्ष 2019-20) कोकणातील 5 जिल्ह्यामध्ये हा पुरस्कार मिळवणारी ही एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे. महाराष्ट्रातील 14 ग्रामपंचायती, 2 पंचायत समित्या आणि 1 जिल्हा परिषदेला हा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराचे वितरण 24 एप्रिलला राष्ट्रीय पंचायत राज दिनाच्या दिवशी दिल्लीला होणार आहे.

2011-12 या वर्षापासून भारत सरकारतर्फे ग्रामीण भागाच्या विकासासाठी कल्पकतेने वेगवेगळ्या योजना तयार करुन त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे. आणि या योजनेतुन झालेला विकासाचे दृष्य स्वरुप तयार करणार्‍या ग्रामपंचायतींना पंडित दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. ग्रामपंचायतींच्या निवडीसाठी केंद्र सरकार एक प्रश्‍नावली देते. यामध्ये ग्रामपंचायतीच्या मासिक सभा, ग्रामसभांची उपस्थिती, त्यामध्ये होणारे ठराव, त्यांचे क्रियान्वयन, मागासवर्गीयांचा ग्रामसभांमधील सहभाग, नैसर्गिक स्त्रोतांचे व्यवस्थापन, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रातील काम, ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात लोकाभिमुख विकास, महसुल वाढ, मागासवर्गीय लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राबवलेल्या योजता आदी अनेक मुद्द्यांचा समावेश असतो.

गुहागर तालुक्यातून पाटपन्हाळे आणि अंजनेवल या दोन ग्रामपंचायतींची निवड विभाग स्तरापर्यंत झाली होती. त्यानंतर पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे नांव मागे पडले. अंजनवेल ग्रामपंचायतीमध्ये प्रत्यक्ष तपासणीसाठी जानेवारी 2021 मध्ये कोल्हापुर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आले होते. 31 मार्चला अंजनवेल ग्रामपंचायतीला पुरस्कार मिळाल्याची घोषणा केंद्र सरकारने केली. याबाबतचे पत्र 2 एप्रिलला सायंकाळी पंचायत समिती मार्फत अंजनवेल ग्रामपंचायतीला मिळाले.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top