Thursday, December 03, 2020 | 01:05 PM

संपादकीय

कोरोना उतरणीला?

गेले वर्षभर आपल्या मागे साडेसातीसारखा लागलेला कोरोना आता उतरणीला लागला आहे....

पेण तालुक्यातील भातशेतीला उधाणाचा तडाखा
रायगड
27-Oct-2020 06:09 PM

रायगड

हमरापूर  

  पेण तालुक्यातील वाशी खारेपाट विभागातील भाल ,विठ्ठलवाडी, ठाकूर बेडी व परिसरात समुद्राच्या उधाणाचे पाणी भातशेतीमध्ये शिरून प्रचंड प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे.

   परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्यानंतर या भागातील समुद्रालगत असणारे भाल, विठ्ठल वाडी, ठाकूर बेडी, लाखोले, जनवली, दिव बेडी, मंञीबेडी  इत्यादी गावांच्या लगत असणार्‍या समुद्राच्या बांधला तसेच उघडीला उधाणाच्या पाण्यामुळे खांडी जाऊन  येथील तीनशे ते चारशे एकर शेतीमध्ये खारे पाणी शिरून संपूर्ण शेती खार्या पाण्याने जलमय झाली आहे .अशा अवस्थेत येथील काळ्यामातीत सेवा करणारा शेतकरी बळीराजा अतिशय दुःखी झाला असून वर्षातून एकदा येणारा पिक हाता तोंडातून जात असल्यामुळे या परिसरातील शेतकरी चिंतातुर झाला आहे.

  वर्षभर शेतात घामाच्या धारा घालून काम करणारा हा शेतकरी वर्ग सतत उपेक्षितच आहे .अतिशय कष्टमय जीवन जगणारा शेतकरी वर्ग पुन्हा एकदा समुद्राच्या पाण्याच्या भितीने उदास झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती देताना या विभागातील शेतकरी ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी तसेच सतत होणार्‍या या उधाणाच्या पाण्यामुळे होणार्‍या नुकसानीकडे संबंधित विभागाने लक्ष दिला नाही तर संपूर्ण वाशी नाक्या पर्यंत खार्‍या पाण्याचे पाणी शिरून शेती जलमय होऊन खारफुटी मध्ये व्यापली जाईन अशी भीती व्यक्त  केली. या विभागात साधे पिण्याचे पाणी देखील मिळत नाही .लोकं पावसाचा पाणी साठवून उन्हाळ्यात त्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात. पावसाळ्यात प्रत्येकाच्या घराच्या शेजारी प्लास्टिकच्या मोठ्या टाक्यांमध्ये पाणी साठवून तो पाणी वापरतात, ही या विभागाची शोकांतिका असून अजूनही हा विभाग दुर्लक्षितच आहे. अशा प्रतिक्रिया येथील लोकांकडून ऐकायला मिळत आहे

   समुद्राच्या खांडी तसेच  उघाड्यांच्या दुरुस्तीचं काम  वेळीच झाला नाही तर प्रचंड मोठा धोका पेण तालुक्यातील खारेपाट विभागाला सोसावा लागेल आणि त्यातून खूप मोठे नुकसान होईल असे या लोकांचे म्हणणे आहे. सदर खांडी, उघाडे बांधण्याकडे संबंधित विभागाने तसेच प्रशासनाने वेळीच लक्ष घालावा आणि या  खांडी व उघडी यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top