रेवदंडा  

कोरोना संसर्ग रोगापासून दुर असलेल्या रेवदंडा ग्रामपंचायत हद्दीत कोरोना संसर्ग रोग रूग्णाची संख्या वाढीस जात असल्याचे चित्र आहे. रेवदंडा ग्रामपंचायत हद्दीत कोरोना संसर्ग रोगाचा कहर सुरू असल्याचे चित्र दिसते.

अल्पावधीत कोरोना संसर्ग रूग्णाची संख्या 89 पर्यंत पोहचली असून यामध्ये नऊ जणांचा मुत्यू झाल्याची नोंद आहे. एकूण कोरोना संसर्ग रोगातून 27 रूग्ण बरे झाले असून सध्या अ‍ॅक्टीव्ह रूग्ण संख्या 45 असल्याची माहिती रेवदंडा ग्रामपंचायतीकडून प्राप्त झाली.

सुरूवातीचे दिवसात कोरोना संसर्ग रोगापासून दुर असलेल्या रेवदंडा ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाने थेरोंडा परिसरातून शिरकाव घेतला, त्यानंतर रेवदंडा शहरात ठिकठिकाणी कोरोना संसर्ग रूग्ण आढळून आले आहेत. दिवसेंदिवस कोरोना संसर्ग रोगाची वाढती संख्या संपुर्ण रेवदंडाकराच्या डोक्यावर टांगती तलवार ठेवून आहे. शिवाय कोरोना संसर्ग रोगाची लागण झालेले अनेक रूग्ण उपचाराकरता दाखल न होता रेवदंडामध्ये फिरत असल्याची चर्चा आहे.  तर कोरोना संसर्ग रूग्णाच्या संपर्कात आलेले व्यक्ती कॉरटाईन न होता, कसलीही भितीचा लवलेश न बाळगता फिरत असल्याचे दिसून येतात. ज्या परिसरात कोरोना रूग्ण सापडला आहे, त्या भागाला सिल करणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थाचे म्हणणे आहे, शिवाय कोरोना रूग्णाच्या संपर्कात आलेल्या व क्वॉॅरंटाईन म्हणून घोषीत केलेल्या व्यक्तीने कोरोना संसर्ग रोग पसरू नये म्हणून खबरदारी घेणे जरूरीचे आहे. कोरोना संसर्ग रूग्णाची संख्या रेवदंडयात दिवसेंदिवस वाढीस जात असून जर कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली गेली नाही तर कोरोना संसर्ग रोग वाढीस जाईल व निश्‍चितपणे रूग्ण संख्येत वाढ होईल.

कोरोना संसर्ग रोग आटोक्यात आणण्यासाठी खबरदारी व काळजी घेणे जरूरीचे असल्याचे सर्वच ग्रामस्थांचे मत आहे, त्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर, शासनाव्दारे कठोर पावले उचलावीत लागतील, रेवदंडा बाजारपेठेत अनेकजण मॉक्स न लावता तसेच सोशल डिस्टंन्शिंगचा वापर करत नसल्याचे चित्र आहे. यासाठी दंडात्मक कारवाई करणे जरूरीचे असल्याचे अनेक सुज्ञ नागरिकांचे मत आहे.

 

अवश्य वाचा