Friday, March 05, 2021 | 06:30 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

उरणमध्ये महावितरणचा उघडा कारभार
रायगड
23-Feb-2021 03:12 PM

रायगड

उरण | वार्ताहर

उरण शहरातील मुख्य रस्त्यावरील महावितरणच्या डी.पी. उघड्या असून, विजेचा शॉक लागून जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची संभावना अधिक आहे. यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, महावितरण अधिकार्र्‍यांचे दुर्लक्ष होत आहे.

उरण शहरातील वाणी आळी कॉर्नर, महात्मा गांधी पुतळ्यासमोरील प्रोफेशनर कुरिअरजवळ व रसवंती गृहासमोरील बाजूस महावितरणच्या विजेच्या दोन डी.पी. चार ते पाच महिन्यांपासून उघड्या असून, त्यांच्यावरील झाकणे निघालेली आहेत. आतील फ्यूज व वीजपुरवठा वायर्स दिसत आहेत. त्यामुळे लहान मुले, वयस्कर व्यक्ती व त्या रस्त्यातून येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांना विजेचा शॉक लागून मोठा अपघात होण्याची शक्ता दाट आहे. परंतु, या गंभीर बाबीकडे लक्ष दिले जात नसल्याने महावितरणाचा अकार्यक्षम कारभार चव्हाट्यावर आला आहे. महावितरणला एखाद्याचा जीव गेल्यावर जाग येणार का? असा प्रश्‍न उरणकर जनतेकडून विचारला जात आहे. त्याकडे संबंधित अधिकार्‍यांनी लक्ष देऊन त्वरित डी.पी. दुरुस्त कराव्यात, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top