Wednesday, May 19, 2021 | 02:35 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा ऑनलाईन वेबिनार
रायगड
12-Apr-2021 08:01 PM

रायगड

 

। खरोशी । वार्ताहर ।

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय ओबीसी महासंघाने 11 एप्रिल रोजी भारत अमेरिका लंडन येथून ऑनलाईन वेबिनार घेण्यात आली. या वेबिनारचे उद्द्याटन मदत व पुनवर्सन तथा बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री राजेंद्र पाल सिंग, सेवानिवृत्त न्यायाधीश व्ही. ईश्‍वरैया, भाजप ओबीसी मोर्चाचे अयक्ष डॉ. के. लक्ष्मण, माजी मंत्री महादेव जानकर, हरियाणाचे माजी खासदार राजकुमार सैनी, इंदरजीत सिंग, अमेरिकेतून डॉ. हरी इपण्णापेल्ली, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे उपस्थित राहणार आहे. यावेळी दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. सुधांशु कुमार, ऑल इंडिया ओबीसी फेडरेशनचे सचिव जी. करूनानिधी, कलिंदी महाविद्यालयाच्या सहाय्यक प्रा. डॉ. सीमा माथूर यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तसेच यावेळी ओबीसींसाठी जनगणना होणे, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे, नॉनक्रिमिलिअरची मर्यादा वाढवणे, रोहिणी आयोग रद्द करणे, ओबीसी शेतकर्‍यांना पेन्शन मिळावी, शिष्यवृत्ती योजना लागू करावी, जिल्हा व तालुका स्तरावर वसतीगृहे सुरू करावी,27टक्के आरक्षणाचा लाभ मिळावा यासारख्या विविध प्रकारच्या समस्या मांडण्यात आल्या.

या वेबिनारमध्ये सहभागी झालेल्या सर्वांना या वेबिनारला मोठ्या संख्येने ओबीसीबांधव उपस्थित होते. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय महासचिव तथा कार्यक्रम समन्वयक सचिन राजुरकर व राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, श्याम लेडे, राज्याध्यक्ष अनिल नाचप्पले, राज्य सरचिटणीस राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ यांनी सुनियोजित पद्धतीने कार्यक्रम आयोजित केला होता

 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top