रायगड
अलिबाग विशेष प्रतिनिधी
सलग तिसऱ्या दिवशी अलिबाग तालुक्यातील दिवसभरातील कोरोनाची रुग्णसंख्या शुन्य झाली आहे. तर आज एक रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे.
रविवार, सोमवार असे लागोपाठ दोन दिवस एकही नवीन रुग्ण आढळलेला नसताना सलग तिसऱ्या दिवशी देखील एकही नवीन रुग्ण आढळला नसल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. तर बरे वाटल्याने आज रेवदंडा येथील एका रुग्णाला घरी सोडण्यात आले.
आतार्यंतच्या रुग्णसंख्येनुसार तालुक्यातील एकूण रुग्ण 5 हजार 175 झाले असून त्यापैकी 141 जणांचा मृत्यू झाला आहे तर 5 हजार 013 जण कोरोनमुक्त झाले तर सद्यस्थितीत 21 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.