Thursday, January 21, 2021 | 12:15 AM

संपादकीय

‘बर्ड फ्लू’चा वाढता धोका

संकटं एकटी-दुकटी न येता चोहीकडून येतात आणि घेरुन टाकतात

नियम पाळल्यास पुन्हा लॉकडाऊन नाही
रायगड
01-Dec-2020 09:01 PM

रायगड

अलिबाग 

दिल्ली, केरळ, राजस्थानमध्ये कोरोनाची दुसरी लाट पसरली आहे. रायगड जिल्ह्यात कोरोनाची मोठी लाट आली नसली तरी नागरिकांनी त्रिसूत्री नियमांचे पालन केल्यास जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याची गरज भासणार नाही, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.

सुरक्षित अंतर ठेवा, मास्क लावा, सॅनिटायझरचा वापर करा या शासनाने दिलेल्या त्रिसूत्रीचा वापर नेटाने करा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे. लग्नसराई हंगाम पुन्हा सुरू झाला असला तरी कमी नातेवाईकांच्या सोबतीने सोहळा पार पाडा, गर्दीची ठिकाणे टाळा जेणेकरून जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्ण रोखण्यास मदत मिळणार आहे. जिल्ह्यात कोरोना सध्यातरी आटोक्यात आहे. त्यामुळे आपल्याला कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्या, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. शासनाने आखून दिलेल्या त्रिसूत्री नियमाचे पालन नागरिकांनी काटेकोर पालन करणे महत्त्वाचे आहे. कोरोनाची लस तयार होत आहे. जोपर्यंत प्रत्येक नागरिकांपर्यंत ही लस पोहोचत नाही, तोपर्यंत नियमाचे पालन केल्यास जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याची गरज भासणार नाही, असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top