रायगड
। मुंबई । प्रतिनिधी ।
पहिली ते आठवीप्रमाणेच आता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही पेपर न घेता सरसकट पास केले जाणार आहे.तसा निर्णय शालेय शिक्षण मंत्रालयाने घेतला आहे.गेले दोन दिवस परीक्षांसंदर्भात चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नववी आणि अकरावीच्या परीक्षा न घेता सर्वांनाच पुढील वर्गात घातले जाणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यानी जाहीर केले.