अलिबाग 

अरबी समुद्र किनारपट्टीवर घोंगावणारे निसर्ग चक्रीवादळ उत्तर दिशेने सरकत असून पणजी हरिहरेश्वर यांच्या मधोमध असणारे हे चक्रीवादळ दुपारी २.३० च्या सुमारास अलिबाग किनारपट्टीवर थडकण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. सकाळपासूनच वाहत असलेल्या वारा वेग धरत असून समुद्रातील लाटांची उंचीदेखील वाढत असल्याचे मच्छीमारांनी सांगितले.

 पश्चिम अरबी समुद्रावरील निसर्ग चक्रीवादळ ' मागील ६ तासात ११ किमी प्रतितास वेगाने उत्तर-ईशान्य दिशेने सरकत असून पूर्वेकडील अरबी समुद्राकडे अक्षांश १७.१ ° एन आणि रेखांश .८१.8 च्या जवळपास ०२ जून, २०२० रोजी दुपारी २.३० दरम्यान मध्यभागी सरकत असल्याचे दिसत आहे.  पणजि (गोवा) च्या पश्चिम-वायव्य-पश्चिमेस सुमारे २०० कि.मी., मुंबई (महाराष्ट्र) च्या २५० कि.मी. दक्षिण-नैऋत्य, अलिबाग (महाराष्ट्र) च्या २०० किमी दक्षिण-नैऋत्य आणि सूरत (गुजरात) च्या दक्षिण-नैऋत्येकडे या वादळाचा रोख दिसत आहे. 

पुढील ६ तासांत तीव्र चक्रीवादळाच्या वादळामध्ये तीव्रता येण्याची शक्यता आहे. उत्तर दिशानिर्देशकडे जाणे आणि उत्तर महाराष्ट्र व तेथील दक्षिणेकडील किनारपट्टी, श्रीवर्धन-हरिहेश्वर आणि दमण यांच्या दरम्यान तसेच रायगड जिल्ह्यातील अलिबाग च्या किनारपट्टीवर आज दुपारी वेगवान चक्रीवादळ  होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या वाऱ्याचा वेग हा ११० किमी प्रतितास गस्टिंग ते १२० किमी प्रतितास असा असणार आहे.बुधवारी सकाळपासूनच रायगडच्या किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत असून रिमझिम पाऊस देखील पडण्यास सुरुवात झाली आहे. 

मुंबई (महाराष्ट्र) आणि गोवा येथे डॉप्लर वेदर रडार (डीडब्ल्यूआर) द्वारे या यंत्रणेचा सतत मागोवा घेतला जात आहे.रायगड किनारपट्टीवरील 60 गावांमध्ये सुमारे 1 लाख 73 हजार नागरिक राहत आहेत. येथे कुठल्याही प्रकारे मनुष्यहानी होऊ नये, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. एडीआरएफच्या दोन तुकड्या दाखल झाल्या असून एक तुकडी हरिहरेश्‍वर तर दुसरी अलिबागला तैनात आहे.

मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या 5 हजार 668 मच्छिमारांना परत बोलावून घेण्यात आले आहे. ज्यांची घरे कच्ची आहेत त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

अवश्य वाचा

देशात 25 हजार रुग्णांची वाढ