नेरळ  

मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील नेरळ - भिवपुरी रोड रेल्वे स्टेशन दरम्यान असलेले फाटक 21 आणि 22 सप्टेंबर रोजी वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. त्या ठिकाणी असलेल्या रुळाखाली खडी टाकण्याचे काम करण्यासाठी हे फाटक बंद ठेवले जाणार असून यापूर्वी याच महिन्यात तीन दिवस फाटक बंद ठेवण्यात आले होते.

मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर नेरळ - कर्जत या स्थानकादरम्यान असलेले मुंबई वरून 86 किलोमीटर अंतरावर गेट नंबर 21 आहे.हे फाटक नेरळ ग्रामपंचायत हद्दीत येत असून नेरळ रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर लोकवस्तीत हे फाटक आहे.कर्जत तालुक्याचा अर्धा भाग असलेल्या कशेले पासून कळंब पर्यंतच्या 100 हुन अधिक गावातील लोक नेरळ गावात येण्यासाठी या फाटकाचा वापर करतात.त्यामुळे या फाटकातून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते.त्यामुळे या फाटकातील मध्य रेल्वे च्या रुळांची दुरुस्ती सातत्याने करावी लागत असते.वाहनांच्या वर्दळीमुळे मार्गावरील रुळाची दुरुस्ती ऐवजी रुळामध्ये असलेला रस्ता सुस्थितीत असावा यासाठी मध्य रेल्वे कडून फाटक बंद करून दर दोन वर्षांनी दुरुस्तीची कामे केली जात असतात.दुसरीकडे हे फाटक बंद राहणार असल्याने नेरळ बाजारात येण्यासाठी वाहनचालक आणि लोकांना दूरच्या फेरा मारून यावे लागणार आहे.त्याचवेळी नेरळ गावातील रहिवासी यांना देखील दूरचा फेरा मारून पलीकडे असलेल्या भागात जावे लागणार आहे. त्यासाठी वाहनचालक यांना दामत येथे असलेल्या गेट नंबर 20 चा पर्याय निवडावा लागणार आहे.तर रेल्वे फाटक ओलांडून नेरळ गावात येऊन कर्जतला जाणार्‍या वाहनचालक यांना कोल्हारे साई मंदिर नाका येऊन पेशवाई रस्त्याने आंबिवली- माणगाव फाटक येथे जावे लागणार आहे.त्यात त्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झालेली असल्याने नेरळ फाटक बंद असल्याने पुरती कसोटी लागणार आहे.नेरळ फाटक बंद असल्याचा फटका सर्वांना बसणार असून उपनगरीय लोकल गाड्या बंद असल्याने सर्व प्रवास हा वाहनांनी होत असल्याने रुळाखाली असलेली खडी अधिक प्रमाणात खचली होती आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.हे लक्षात घेऊन 3 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर या कालावधीत देखील फाटक बंद ठेवण्यात आले होते आणि दुरुस्तीची कामे करण्यात आली होती.मात्र त्यावेळी अर्धवट राहिलेली कामे आता 21 सप्टेंबर आणि 22 सप्टेंबर या कालावधीत पूर्ण केली जाणार आहेत.

 

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त